आज (19 फेब्रुवारी) पासून चॅम्पियन्स ट्रॉफी ची सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध मिचेल सॅटनर च्या नेतृत्वाखाली असलेला संघ न्युझीलंड हे समोरसमोर असणार आहेत. आज सर्व चाहत्यांच्या नजरा पाकिस्तान विरुद्ध न्युझीलंड या सामन्यावरती असणार आहेत, परंतु आज कराची मधील वातावरण कसे असेल? आज पाऊस पडण्याची शक्यता किती आहे? याच प्रश्नांची उत्तरे सविस्तर जाणून घेऊयात.
हवामान खात्या नुसार, कराची मध्ये पाकिस्तान आणि न्युझीलंड सामन्या दरम्यान थोडेसे ढग दाटून येतील. पण हे जास्त काळ टिकून राहणार नाही. क्रिकेप्रेमींसाठी आनंदाची बातमी ही आहे की, वातावरण खेळासाठी अनुकूल असणार आहे. आज कराची मध्ये 54 टक्के आर्द्रता असणार आहे. याशिवाय पावसाची शक्यता जवळजवळ 10 टक्के आहे. त्याबरोबरच, कराची मध्ये पाकिस्तान विरुद्ध न्युझीलंड सामन्याच्या वेळी हवेचा वेग 21किमी/1 तास असा असेल.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडने पाकिस्तानला तिरंगी मालिकेच्या अंतिम टप्प्यात हरविले होते. आता तेच दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात समोरासमोर असणार आहेत. मिचेल सॅटनर च्या नेतृत्वाखाली असलेल्या न्युझीलंड संघाला मानसशास्त्रज्ञाचा फायदा होऊ शकतो. यापूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत न्युझीलंड ने पाकिस्तानला पाच षट्कांनी हरविले होते. आता आजच्या सामन्यात कोण कोणाला हरवणार ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या :
वनडे इतिहासात पहिल्यांदाच घडला मोठा पराक्रम, दोन संघांनी मिळून बनवला अनोखा विक्रम
दुःखद बातमी! दिग्गज क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांचे 76व्या वर्षी निधन
चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरूवात, इतक्या वर्षांनंतर पाकिस्तानात खेळली जाणार ICC स्पर्धा






