कोविड-19 च्या दिवसांची आठवण करून देत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीचे आयोजन रिकाम्या स्टेडियममध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीने असे म्हटले आहे की, पुढील वर्षाच्या सुरुवातीस आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी सुरू आहे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे हा निर्णय घेण्यात आले आहे.
दिलेल्या विधानामध्ये पीसीबीने सांगितले, ‘आम्ही समजतो की आमचे उत्साही प्रेक्षक क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, आमच्या खेळाडूंना प्रेरणा आणि ऊर्जा देतात. पण आमच्या चाहत्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. स्टेडियमच्या बांधाकामप्रसंगी त्यांना जर प्रवेश दिले तर ते धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे सामना खुल्या मैदानात खेळवला जाणार आहे.
निवेदानात पीसीबी पुढे असे सांगितले, सर्व उपलब्ध पर्यायांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, आम्ही रिकाम्या स्टेडियममध्ये दुसरी कसोटी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या कसोटी सामन्यांच्या तिकिटांची विक्री तत्काळ स्थगित करण्यात आली आहे. पण ज्या चाहत्यांनी आधीच तिकिटे खरेदी केली आहेत त्यांना आपोआप संपूर्ण परतावा मिळेल जो तिकीट खरेदी करताना दिलेल्या खात्याच्या तपशीलात जमा केला जाईल. असेही बोर्डाने म्हटले आहे.
बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान पहिला कसोटी सामना 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. तर दुसरा सामना 30 ऑगस्टपासून 03 सप्टेंबर पर्यंत खेळवली जाणार आहे.
पाहा या मालिकेसाठी दोन्ही देशांचा संघ
बांग्लादेश संघ – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्किन अहमद, सय्यद खालिद. अहमद, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम आणि हसन महमूद
पाकिस्तान संघ – शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक) आणि शाहीन शाह आफ्रिदी
हेही वाचा-
‘बुची बाबू टूर्नामेंट’ काय आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार, ईशान किशन अन् श्रेयस अय्यर सारखे स्टार खेळाडू खेळतील?ॉ
37 वर्षीय रोहित शर्माची वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, या क्रिकेटपटूंचे मात्र नुकसान
काैतुकास्पद…!! श्रीजेशसोबत त्याची 16 क्रमांकाची जर्सीही निवृत्त, हॉकी इंडियाची मोठी घोषणा