पाकिस्तान क्रिकेट संघाने मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडला हरवून इतिहास रचला. रावळपिंडीच्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा 9 गडी राखून पराभव केला. 2021 नंतर पाकिस्तानचा घरच्या कसोटी मालिकेतील हा पहिला विजय ठरला. साजिद खान आणि नोमान अली यांनी या सामन्यात संघासाठी चमकदार कामगिरी केली. या सामन्यात साजिदने 10 आणि नोमान अलीने 9 विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावात साजिद खानने अष्टपैलू खेळी करत 6 बळी घेत 48 धावाही केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात साजिदने 4 बळी घेतले. याशिवाय नोमान अलीने पहिल्या डावात 3 बळी घेतले आणि फलंदाजी करताना 45 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात नोमानने 6 विकेट घेतल्या. या सामन्यात पाकिस्तानच्या सर्व 20 विकेट फिरकीपटूंनी घेतल्या.
पाकिस्तानने मालिका 2-1 ने जिंकली. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पुढच्या दोन कसोटी जिंकून पाकिस्तानने मालिका जिंकली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बाबर या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा भाग होता. ज्यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुढच्या दोन सामन्यांमध्ये पीसीबीने बाबर आझमला बाहेरचा रस्ता दाखवला. बाबर शिवाय संघाने मालिका जिंकून इतिहास रचला.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात 267/10 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात 344/10 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव केवळ 112 धावांत गडगडला आणि इंग्लिश संघाने पाकिस्तानसमोर केवळ 36 धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानने 3.1 षटकात 37/1 धावा करून विजय मिळवला. अशा प्रकारे पाकिस्तानने प्रदीर्घ कालावधीनंतर घरच्या भूमीवर विजयाची चव चाखली.
हेही वाचली-
रवींद्र जडेजानं रनआऊट करताना दाखवली ‘धोनी’ सारखी हुशारी, कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO पाहा
IND vs NZ: पुण्यात वॉशिंग्टनचा ‘सुंदर पराक्रम’, 11 विकेट्स घेत खास क्लबमध्ये प्रवेश
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी या 3 दिग्गज खेळाडूंकडे दुर्लक्ष, कारकीर्द संपली?