पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग संघात शुक्रवारी (02 सप्टेंबर) आशिया चषक 2022 मधील सहावा आणि अखेरचा साखळी फेरी सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंपुढे हाँगकाँगने अक्षरश लोटांगण घातले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकात 2 विकेट्सच्या नुकसानावर 193 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ केवळ 38 धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांनी 155 धावांनी हा सामना गमावला. हा हाँगकाँगचा आतापर्यंतचा सर्वात लाजिरवाणा पराभव होता.
या सामन्यात (PAKvsHK) प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सलामीवीर मोहम्मद रिझवान (नाबाद 78 धावा) आणि फखर जमान (53 धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने 193 धावा फलकावर लावल्या होत्या. मात्र पाकिस्तानच्या या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांचे दहाच्या दहा फलंदाज एकेरी धावेवर बाद झाले.
हाँगकाँगचा कर्णधार निजाकत खान याने सलामीला फलंदाजीला येत सर्वप्रथम आपली विकेट गमावली. तो 13 चेंडू खेळताना केवळ 8 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर हाँगकाँगचा धाकड फलंदाज बाबर हयात यालाही मोठी खेळी करण्यात यश आले नाही. तो 4 चेंडू खेळताना खातेही न खोलता माघारी परतला. पुढे यासिम मुर्तजा (02 धावा), एजाज खान (01 धाव), किंचित शाह (06 धावा), स्कॉट मॅकिन (04 धावा) हे आघाडीचे 6 फलंदाजाही एकेरी धावेवरच माघारी परतले.
A sublime performance from Pakistan, both with and without the ball! 🇵🇰
They move on to the Super 4 to face India on Sunday! ⌛#PAKvHK #ACC #AsiaCup2022 #GetReadyForEpic pic.twitter.com/Lg3Z41zjt6— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 2, 2022
त्यानंतर खालच्या फळीत झीशन अली, हरून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला आणि मोहम्मद गांजाफर हेदेखील एकेरी धावेवरच राहिले. त्यांनी प्रत्येकी 3, 3, नाबाद शून्य, 1 आणि शून्य धावा केल्या. अशाप्रकारे 10.4 षटकात केवळ 38 धावांवर हाँगकाँगचा संघ गुंडाळला गेला.
ही हाँगकाँगने आजवरच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात केलेली सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे. एकूण आकडेवारी पाहायची झाल्यास, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील ही नववी सर्वात निच्चांकी धावसंख्या होती. या नकोसा आकडेवारीत हाँगकाँगने कॅमरून संघाची बरोबरी केली आहे. कॅमरूनने नोव्हेंबर 2021 मध्ये मोझाम्बिक संघाविरुद्ध फक्त 38 धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नोट करा! सुपर-4 मध्ये पुन्हा भिडणार भारत आणि पाकिस्तान, असे आहे संपूर्ण वेळापत्रक
आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट
रविवारी भारत-पाकिस्तान सामना फिक्स! हाँगकाँगचा तब्बल 155 धावांनी लाजीरवाणा पराभव