न्यूझीलंड क्रिकेट संघ 2 कसोटी आणि 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना नॅशनल स्टेडिअम कराची येथे खेळला जात आहे. मात्र, दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. पाकिस्तानचा फलंदाज सरफराज अहमद याला यष्टीचीत बाद दिले गेले होते. त्यामुळे सरफराजला शतक ठोकता आले नव्हते. त्यानंतर यादरम्यानचा व्हिडिओ आणि फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कराची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघाच्या पहिल्या डावात सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याने खेळपट्टीवर उतरत दमदार खेळी साकारली. यादरम्यान त्याने सऊद शकील याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारीही रचली होती. सरफराज त्याचे शतक ठोकण्यासाठी वेगाने पुढे जात होता. जेव्हा दुसरे सत्र संपणार होते, तेव्हा त्याच्या आधीच टॉम ब्लंडेल (Tom Blundell) याच्या वेगवान यष्टीरक्षणावर तिसऱ्या पंचांनी सरफराजला बाद घोषित केले.
सरफारजसोबत झाली फसवणूक?
सरफराज याची विकेट पडताच एकीकडे न्यूझीलंड संघाला मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे, पंचांच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांना मात्र धक्का बसला. खरं तर, डॅरिल मिचेल याने टाकलेला चेंडू स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला मारण्यास सरफराज चुकला आणि त्याचा पाय थोडासा हवेत उचलला गेला. अशात लगेच यष्टीरक्षक ब्लंडेल याने त्याला यष्टीचीत केले. मात्र, जेव्हा रिप्लेमध्ये दिसले, तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या. कारण, हे स्पष्ट होत नव्हते की, सरफराजचा पाय हा हवेत होता की, जमिनीवर.
या वादग्रस्त निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवर एक पोस्ट करत चाहत्यांकडे हा निर्णय योग्य होता का? असा प्रश्न विचारला. पीसीबी बोर्डाने ट्वीट करत लिहिले की, “बाद की नाबाद?”
याव्यतिरिक्त चाहत्यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. अनेकांनी ट्वीट करत याला पंचांचा निर्णय चुकीचा आणि खराब पंचगिरी म्हटले आहे. एकाने लिहिले आहे की, “आणखी एक मोठी चूक आणि पंचांचा खराब निर्णय. सरफराज अहमदचा पाय क्रीझवर असूनही त्याला बाद देण्यात आले. ही पीसीबीची महान पंचगिरी नाहीये. जेव्हाही पंचाला शंका असते, तेव्हा निर्णय फलंदाजाच्या बाजूने असतो. खूपच दुर्दैवी.”
कराची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 9 विकेट्स गमावत 407 धावा केल्या होत्या. सौद शकील याने चांगली फलंदाजी करत 124 धावांची नाबाद खेळी साकारली. तरीही न्यूझीलंड संघ पाकिस्तान संघापेक्षा 42 धावांनी पुढे आहे. हा सामनादेखील अनिर्णित होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, पहिला कसोटी सामनाही अनिर्णित राहिला होता. (pak vs nz pakistani cricketer sarfaraz ahmed stump out controversial decision karachi test match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा क्रिकेटशी जोडली गेली अभिनेत्री मंदिरा बेदी, आयपीएलच्या ‘या’ संघासोबत केली हातमिळवणी
मोठी बातमी! तब्बल 4 वर्षांनी केले कमबॅक, पण सामन्यापूर्वीच झाला कोरोना पॉझिटिव्ह; तरीही खेळतोय सामना






