टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत अंतिम सामना खेळणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला, जो पाकिस्तानने 7 विकेट्स राखून नावावर केला. पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत कशीबशी जागा मिळवली होती आणि आता उपांत्य सामना जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडची मात्र पुन्हा एकदा निराशा झाली. पाकिस्तानच्या विजयात त्यांचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांचे योगदान महत्वाचे राहिले.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये उपांत्य सामन्यापूर्वी खराब फॉर्ममध्ये दिसला होता. पण उपांत्य सामन्यात त्याची बॅट पुन्हा एकदा तळवली. बाबर मोहम्मद रिजवान (Mohammad Rizwan) याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आला आणि अर्धशतक ठोकले. रिजबानने देखील अर्धशतक पूर्ण करत पाकिस्तानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. बाबरने एकूण 42 चेंडू खेळले आणि 53 धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याला झेलबाद केले. दुसरीकडे मोहम्मद रिजवानने 43 चेंडूत 57 धावांची सर्वात मोठी खेळी केली.
तत्पूर्वी न्यूझीलंडसाठी त्यांचा कर्णधार केन विलियन्सन (Kane Williamson) याने मोठी खेळी केली. पण त्याचा स्ट्राईक रेट अवघा 109.52चा होता. विलियन्सनने 42 चेंडूत एक चौकार आणि एक षटकराच्या मदतीने 46 धावा केल्या, पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. दुसरीकडे न्यूझीलंडचा मध्यक्रमातील फलंदाज डॅरिल मेचेल (Daryl Mitchell ) याने 35 चेंडूत नाबाद 53 धावा कुटल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने मर्यादित 20 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 152 धावां उभ्या केल्या.
पाकिस्तानला विजयासाठी 153 धावांची आवश्यकता होती, जी त्यांनी 5 चेंडू राखून पूर्ण केली. पाकिस्तानने अवघ्या 3 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. पाकिस्तानच्या विजयात वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) याचेही योगदान महत्वाचे राहिले. त्याने 4 षटकांमध्ये 24 धावा खर्च करून फिन एलन आणि केन विलियम्सन यांच्या विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद नवाजने दोन षटकात 12 धावा देत 1 विकेट घेतली. न्यूझीलंडच्या गोलंदाजी आक्रमणाचा विचार केला, तर ट्रेंट बोल्ड याने, दोन्ही विकेट्स घेतल्या. तर मिचेल सॅटनला एक विकेट मिळाली.
विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड संघात खेळला जाणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जो संघ जिंकले, तो पाकिस्तानसोबत रविवारी (13 नोव्हेंबर) अंतिम सामना खेळेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपात श्रीलंकन खेळाडू अटकेत, आता बोर्ड म्हणतंय, ‘आम्ही उचलणार खर्च’
पाकिस्तानने न्यूझीलंडला रोखलं! अंतिम फेरी गाठण्यासाठी बाबर सेनेसमोर 153 धावांचे लक्ष