आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रविवारी (11 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील ही लढत अतिशय रोमांचक झाली. श्रीलंका संघाने अपेक्षेपेक्षा चांगले प्रदर्शन करून हा अंतिम सामना 23 धावांनी जिंकला. श्रीलंका संघाने जिंकलेली आशिया चषकाची ही सहावी ट्रॉफी ठरली आहे. यापूर्वी पाच वेळा त्यांनी ही ट्रॉफी जिंकली होती. विजयानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने खास प्रतिक्रिया दिली आणि यावेळी त्याच्याकडून अप्रत्यक्षपणे एमएस धोनीचे कौतुक देखील ऐकायला मिळाले.
एमएस धोनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्तावातील चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत ४ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. सीएसकेने त्याच्या नेतृत्वात शेवटचे विजेतेपत 2021 साली मिळवले होते. या अंतिम सामन्यात सीएसकेपुढे कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान होते. केकेआरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती. सीएसकेला जरी पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली असली, तरी त्यांनी मोठी (192) धावसंख्या उभी केली आणि सामना जिंकला देखील.
श्रीलंका आणि पाकिस्तान यांत्यात रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात देखील आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यासारखीच परिस्थिती पाहायला मिळाली. नाणेफेक गमावल्यानंतर श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजीसाठी येऊन मोठी धावसंख्या केली आणि विजय देखील मिळवला. विजयानंतर त्यांचा कर्णधार दासुन शनाका (Dasun Shanaka) माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “आयपीएल 2021 मध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी करून अंतिम सामना जिंकला होता. माझ्या डोक्यात देखील हीच गोष्ट सुरू होती.”
दरम्यान, श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्याचा एकंदरीत विचर केला, तर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या नुकसानावर 170 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तारत पाकिस्तान संघ 20 षटकात 147 धावा करून सर्वबाद झाला. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदु हसरांगा याने पाकिस्तानच्या डावातील 17 व्या षटकात 3 विकेट्स घेतल्या आणि तिथेच सामन्याची दिशा बदलली. तत्पूर्वी भानुका राजपक्षेने त्यांच्यासाठी 71 धावांची वादेळी खेळी केली होती. हसरंगाला आशिया चषकाचा मालिकावीर निवडले गेले, तर राजपक्षे या सामन्याचा सामनावीर ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: गंभीरच्या त्या कृतीने जिंकली कोट्यवधी चाहत्यांनी मने! आता श्रीलंकेतही जिंकू शकतो निवडणूक
आशिया क्रिकेटवर ‘लंकाराज’! पाकिस्तानला लोळवत श्रीलंका आशियाचे चॅम्पियन
आशिया क्रिकेटवर ‘लंकाराज’! पाकिस्तानला लोळवत श्रीलंका आशियाचे चॅम्पियन