टी-20 विश्वचषक 2022 मध्ये गुरुवारी (27 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील तिसरा सामना पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. पाकिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद वसीम जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने गोलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या चार विकेट्स घेतल्या. या प्रदर्शनाच्या जोरावर मोहम्मद वसीम जूनियरच्या नावावर काही खास विक्रमही नोंदवले गेले आहेत.
मोहम्मद असीफ (Mohammad Wasim) जूनियर याने मागच्या एका वर्षात पाकिस्तान संघासाठी अप्रतिम प्रदर्शन केले आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने मागच्या एका वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये 18.21 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या इथिहासातील ही सर्वोत्तम सरासरी देखील ठरली आहे. असे असले तरी, पाकिस्तान संघाकडून मात्र त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले आहे. टी-20 विश्वचषक 2022 मधील हा वसीमचा पहिला सामना होता.
पाकिस्तानचा महत्वाचा खेलाडू आसिफ आली टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात खेळला. परंतु त्याचे प्रदर्शन समाधानकारक राहिले नाही. पहिल्या सामन्यातील निराशाजनक प्रदर्शनानंतर कर्णधार बाबर आझमने आसिफ अलीच्या जागी मोहम्मद वसीमला संघात घेतले. बाबर आझमचा हा निर्णय मोहम्मद वसीमने अगदी योग्य ठरवला. त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात टाकलेल्या 4 षटकांमध्ये 24 धावा दिल्या आणि सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
💥 𝟒-𝟐𝟒
An incredible display by @Wasim_Jnr as he registers his career-best figures 🌟#WeHaveWeWill | #T20WorldCup | #PAKvZIM pic.twitter.com/PXmULFLAOg
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 27, 2022
दरम्यान, पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघातील हा सामना पर्थ येथे खेळण्यात आला. झिम्बाब्वेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली, पण नंतर त्यांची धावगती संथ पडली. मर्यादित 20 षटकांमध्ये झिम्बाब्वेने 8 विकेट्सच्या नुकसानावर 130 विकेट्स घेतल्या. मोहम्मद वसीमव्यतिरिक्त शादाब खान देखील चांगली गोलंदाजी करू शकला. शादावने टाकलेल्या चार षटकांमध्ये 23 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानसाठी त्यांचे सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकले नाहीत. मागच्या मोठ्या काळापासून यो दोघांचा खराब फॉर्म सुरू आहे. संघसाठी बाबर आणि रिजवान जुन्या फॉर्ममध्ये परतणे सर्वात महत्वाचे आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
केएल राहुलच्या खराब निर्णयावर स्पष्टच बोलला सेहवाग; म्हणाला, ‘फॉर्ममध्ये नाहीये तर…’
विश्वचषकात न खेळणे बुमराहला पडले महागात, दोन ओव्हर मेडन टाकत भुवीने ‘या’ विक्रमात केली बरोबरी