आयपीएल २०१९ अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असताना पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद अहमद चौधरी यांनी ARY news या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, या वर्षी आयपीएल पाकिस्तानमध्ये दाखवण्यात येणार नाही.
यावर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी, पीएसएल (पाकिस्तान सुपर लीग) सुरु होती ते व्हा भारत सरकारने आणि भारतीय कंपन्यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तान क्रिकेटवर अन्याय केला आहे तो आम्ही सहन करू शकत नाही, असे कारण देत आयपीएल सुद्धा पाकिस्तानात दाखवली जाणार नाही, असे मत पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद अहमद चौधरी यांनी व्यक्त केले आहे.
फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्यामुळे आयएमजी-रिलायन्स या पीएसएलच्या प्रक्षेपणाचा हक्क घेतलेल्या कंपनीने आपले सगळे हक्क काढून घेतले होते.
पुढे चौधरी म्हणाले, ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारतीय संघाने शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून घातलेली आर्मीची टोपी हे सुद्धा एक राजकारण आहे आणि आम्ही नेहमीच राजकारण आणि क्रिकेटला वेगळे ठेवले आहे. आर्मीची टोपी घालून खेळल्यामुळे कुणीही त्यांच्यावर कारवाई केली नाही.
त्याचबरोबर ते म्हणाले, ‘जर आयपीएलचे प्रक्षेपण पाकिस्तानसारख्या क्रिकेटिंग सुपरपॉवर देशात झाले नाही तर आयपीएलला खूप मोठा तोटा सहन करावा लागेल आणि आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरपॉवर आहे’
आयपीएलच्या १२ व्या मोसमाची सुरुवात येत्या शनिवारपासून होणार असून गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पहिला सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–गौतम गंभीरची नवी इंनिंग, केला या राजकीय पक्षात प्रवेश..
–आयपीएल २०१३ स्पॉट फिक्सिंगवर एमएस धोनीने अखेर सोडले मौन..
–फक्त गौतम गंभीरच नाही, तर या ५ क्रिकेटपटूंनीही आजमावले आहे राजकारणात नशीब






