---Advertisement---

पाकिस्तानच्या ११० किलो वजनाच्या क्रिकेटरला सरावादरम्यान डोक्याला लागला जबरदस्त मार, त्वरित नेले रुग्णालयात

On: शनिवार, जुलै 31, 2021 3:14 PM
---Advertisement---

सध्या पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघामध्ये टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना पार पडला असून पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. यानंतर पाकिस्तान संघाचा ११० किलो वजनाचा फलंदाज आजम खान याला नियोजित प्रशिक्षण सत्रा दरम्यान डोक्याला दुखापत झाली आहे. यामुळे त्याला वेस्ट इंडीज संघाविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यातून बाहेर जावे लागणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘आजम खानला डोक्याला दुखापत झाल्यावर त्वरित जवळच्या रुग्णालयात हालवण्यात आले आहे. तेथील एका न्यूरोसर्जनने त्याला २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यास सांगितले आहे. त्यानंतर सोमवारी त्याचे पुनर्मूल्यांकन होणार आहे.’ त्यामुळे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० सामन्यासाठी उपलब्ध राहू शकणार नाही. तसेच चौथ्या आणि अंतिम टी२० सामन्यासाठी तो संघात असेल की नाही? हे सोमवारी केलेल्या पुनर्मूल्यांकनावर अवलंबून असेल.

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघामध्ये दुसरा टी२० सामना ३१ जुलै रोजी होणार आहे. तिसरा टी२० सामना १ ऑगस्टला होणार आहे. तर चौथा आणि शेवटचा टी२० सामना ३ ऑगस्टला होणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान संघातील २८ जुलै रोजी झालेला पहिला टी२० सामना  पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला होता.

वेस्ट इंडिज संघ
किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन एलन, ड्वेन ब्राव्हो, शेल्डन कॉटरेल, फिडेल एडवर्ड्स, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकेल होसिन, एविन लुईस, ओबेद मॅककॉय, आंद्रे रसेल, लेंडेल सिमन्स, लेंडल सिमन्स, केविन सिंक्लेअर, ओशाने थॉमस, हेडन वॉल्श जूनियर

पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अर्शद इक्बाल, आझम खान, फहीम अशरफ, फखर जमान, हैदर अली, हरीस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक) , मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद, शाहीन शाह आफ्रिदी, शरजील खान आणि उस्मान कादिर

महत्त्वाच्या बातम्या-

बॉस, है हुकुम का इक्का…! कोलंबो विमानतळावर धवन, भुवी अन् चाहरची ‘स्टायलिश एंट्री’, बघा व्हिडिओ

पहिल्या ३ कसोटीत कोहली, रहाणे अन् पुजारा घालणार धावांचा रतीब, माजी कर्णधाराचा दावा

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या २ फिरकीपटूंना खेळवावे? प्रशिक्षक द्रविडने दिले उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---