हाँगकाँग क्रिकेट सिक्स टूर्नामेंटमध्ये पाकिस्ताननं भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. यासह पाकिस्ताननं गट टप्प्यातील दोन्ही सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. या सामन्यात टीम इंडियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकात 119 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, पाकिस्ताननं हा सामना एकही विकेट न गमावता जिंकला. हाँगकाँग सिक्स टूर्नामेंटमध्ये एक संघ 6 खेळाडूंसह मैदानात उतरतो.
भारताकडून रॉबिन उथप्पा आणि भरत छिपली यांनी डावाची सुरुवात केली. उथप्पानं 8 चेंडूत 31 धावा केल्या, तर भरतनं 16 चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली. केदार जाधवला केवळ 8 धावा करता आल्या. त्याच्यानंतर मनोज तिवारीनं 7 चेंडूत 17 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 119 पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानकडून फहीम अश्रफनं दोन्ही विकेट घेतल्या.
120 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानसाठी मुहम्मद अखलाक आणि आसिफ अली धमाकेदार सुरुवात केली. अखलाकनं 12 चेंडूत 40 धावा केल्या, तर आसिफ अलीनं 14 चेंडूत 55 धावा ठोकल्या. मात्र तो सामना संपण्यापूर्वी रिटायर्ड झाला. उरलेलं काम कर्णधार फहीम अश्रफनं पूर्ण केलं. त्यानं अवघ्या 5 चेंडूत 22 धावा केल्या. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, पाकिस्ताननं या स्पर्धेत आतापर्यंत एकही विकेट गमावलेली नाही. त्यांनी यापूर्वी यूएईला एकही विकेट न गमावता पराभूत केलं होतं.
हाँगकाँग सिक्स स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानला यूएईसह क गटात स्थान देण्यात आलंय. पाकिस्ताननं प्रथम यूएईचा पराभव केला. यानंतर त्यांनी टीम इंडियाला हरवून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघ सध्या एक सामना गमावून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडियानं यूएईचा पराभव केल्यास ते उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करू शकतात.
हेही वाचा –
इंग्लंडची फजिती! नेपाळविरुद्ध अवघ्या 4 षटकांत लाजिरवाणा पराभव
लाल कुर्ता, कपाळावर टिळा! महेंद्रसिंह धोनीनं पत्नी साक्षीसोबत अशाप्रकारे साजरी केली दिवाळी; पाहा VIDEO
जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं धक्कादायक अपडेट