पाकिस्तानचा संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला टी२० सामना काल (२१ एप्रिल) हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात आला. या सामन्यात बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने झिम्बाब्वेचा ११ धावांनी पराभव केला. यासह ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
झिम्बाब्वेची झुंज अपुरी
या सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करतांना झिम्बाब्वेने तिसऱ्या षटकातच दोन विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यांनतर तिसऱ्या विकेटसाठी क्रेग एर्विन आणि तिनश कमुनहुक्वे यांनी ५६ धावांची भागीदारी करत झिम्बाब्वेच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण हे दोघे बाद झाल्यानंतर नियमित अंतराने विकेट्स गमावल्याने निर्धारित २० षटकात त्यांना केवळ ७ बाद १३८ धावांचं उभारता आल्या. पाकिस्तानकडून उस्मान कादिरने २९ धावांत ३ तर मोहम्मद हसनैनने २७ धावांत २ बळी घेतले.
मोहम्मद रिझवानची तडाखेबंद खेळी
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करतांना पाकिस्तानची सुरुवात देखील अडखळत झाली होती. दुसऱ्याच षटकात कर्णधार बाबर आझम स्वस्तात माघारी परतला होता. त्यांनतर मोहम्मद रिझवानने इतर फलंदाजांना हाताशी धरून छोट्या छोट्या भागीदारी रचत धावफलक हलता ठेवला होता. मात्र १६व्या षटकात ६ बाद १०० अशा अडचणीत पाकिस्तानचा संघ सापडल्यावर १३० धावांचाही टप्पा ते ओलांडणार की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. पण मोहम्मद रिझवानने शेवटच्या षटकांमध्ये तुफान हाणामारी करत संघाची धावसंख्या १४९ पर्यंत पोहोचवली. रिझवानने ६१ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली. त्यालाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
आता या मालिकेतील दुसरा टी२० सामना शुक्रवारी म्हणजेच २३ एप्रिल रोजी याच मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा पाहुणा संघ असलेल्या पाकिस्तानचा प्रयत्न असेल तर मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी यजमान झिम्बाब्वेला या सामन्यात विजय आवश्यक असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या आई-वडीलांच्या आरोग्याबाबत साक्षीने दिले महत्त्वाचे अपडेट्स; म्हणाली…
फॅन मुमेंट! तगड्या लढतीनंतर आवेश खानमधील रोहित शर्माचा चाहता झाला जागा, केली ‘ही’ खास गोष्ट
‘चेन्नईकडून खेळताना कधी पाहू शकतो?’ चाहत्याच्या प्रश्नाला ताहिरने मन जिंकणारे उत्तर