आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे. तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरून सुरू असलेल्या गोंधळादरम्यान, पाकिस्तानचा पांढऱ्या चेंडूचा नवा कर्णधार मोहम्मद रिझवानने (Mohammed Rizwan) या विषयावर मौन सोडले आहे. त्याने भारतीय संघाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
बाबर आझमच्या (Babar Azam) जागी मोहम्मद रिझवानला (Mohammed Rizwan) पाकिस्तानचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दरम्यान त्याने भारतीय संघाला आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तानात येण्याचा संदेश दिला आहे. मोहम्मद रिझवान म्हणाला, “पाकिस्तान येथील चाहत्यांना भारतीय क्रिकेटपटू आवडतात आणि भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळताना पाहून त्यांना खूप आनंद होईल. ते आले तर आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करू.”
भारताच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत अनिश्चितता आहे. 2008च्या आशिया चषकापासून दहशतवादामुळे दोन्ही देशांतील तणावपूर्ण संबंधांमुळे भारताने पाकिस्तानमध्ये एकही क्रिकेट स्पर्धा खेळली नाही. डिसेंबर 2012 ते जानेवारी 2013 दरम्यान खेळली गेलेली मालिका दोन्ही देशांमधील शेवटची द्विपक्षीय मालिका होती. तेव्हापासून दोन्ही देश केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकामध्येच आमने-सामने आले आहेत. दुसरीकडे 2008च्या आशिया चषकानंतर पाकिस्तानने 3 वेळा भारताचा दौरा केला आहे.
भारत चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यावर काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केएल राहुलच्या जागी कोण बनणार लखनऊचा कर्णधार? सर्वात मोठ्या दावेदाराचं नाव उघड
IPL 2025; मेगा लिलावापूर्वीच शुबमन गिलनं जिंकली चाहत्यांची मनं! घेतला मोठा निर्णय
वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय महिलांसाठी सर्वाधिक शतके