---Advertisement---

“आम्ही टीका करण्याजोगीच कामगिरी केली”, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी दिली कबुली

On: गुरूवार, जानेवारी 7, 2021 10:17 PM
---Advertisement---

नुकतीच न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात दोन कसोटी सामन्याची मालिका पार पडली. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला 101 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या दुसर्‍या सामन्यात सुद्धा पाकिस्तान संघाला 1 डाव आणि 176 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे. त्यानंतर पाकिस्तानच्या संघावर भरपूर प्रमाणात टीका करण्यात आली. यानंतर पाकिस्तान संघाची मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हकने या टीकांवर प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तान संघाला न्यूझीलंड विरुद्धच्या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत 0-2 या फरकाने मानहानिकारक पद्धतीने पराभव पत्करावा लागला. यावर प्रतिक्रिया देताना मिसबाह उल हक म्हणाला की टीका करणे चुकीचे नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया तेव्हा मिसबाहने दिली, जेव्हा पाकिस्तानला यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौर्‍यावर पराभव पत्करावा लागला होता.

मिसबाह उल हकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आलेल्या पाॅडकास्ट मधून म्हणाला, “आमच्या कामगिरीसाठी आम्ही टीका करण्यासाठी पात्र आहोत. जेव्हा लोक तुमच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतात आणि  तुम्ही तशी कामगिरी करत नाही. तेव्हा त्यांनी तुमच्यावर टीका करणे चुकीचे नाही.” मिसबाह म्हणाला त्यांच्या संघाने प्रत्येक विभागात खराब प्रदर्शन केले आहे.

मिसबाह उल हक म्हणाला, “आम्ही ज्या प्रकारे पहिल्या कसोटी सामन्यात कामगिरी केली होती. ती खूप चांगली होती आणि दुसर्‍या कसोटी प्रत्येकाने तशी कामगिरी करायला हवी होती. परंतु असे झाले नाही. आमच्याकडे मालिकेत सामने जिंकण्याच्या संधी होत्या. मात्र आम्ही याचा फायदा उचला नाही.”

पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 155 षटकांत सर्वबाद 431 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 102.2 षटकांत सर्वबाद 239 धावा केल्या. त्याचबरोबर दुसर्‍या डावात न्यूझीलंड संघाने आपला दुसरा डाव 5 बाद 180 धावसंख्येवर घोषित केला आणि पाकिस्तान संघाला फलंदाजी आमंत्रित केले. तेव्हा पाकिस्तान संघाने दुसर्‍या डावात सर्वबाद 271 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तान संघाचा 101 धावांनी पराभव झाला.

त्यानंतर दुसर्‍या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 83.5 षटकांत सर्वबाद 279 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात 158.5 षटकांत 6 बाद 659 धावसंख्या करून डाव घोषित केला. त्यानंतर पाकिस्तान संघाने दुसर्‍या डावात 81.4 षटकांत सर्वबाद 186 धावसंख्या केली. त्यामुळे पाकिस्तान संघाचा 1 डाव आणि 176 धावांनी पराभव झाला.

महत्त्वाच्या बातम्या –

ज्या नवदीप सैनीने सिडनीत कसोटी पदार्पण केले, त्याच्यासाठी एकवेळ भांडला होता गंभीर

… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती

“विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---