भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतून बाहेर झाला आहे. इंग्लंड संघाने भारतीय संघाचा 10 विकेट्सने दारुण पराभव करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे दार ठोठावले आहे. या पराभवामुळे भारतीय संघाला क्रिकेट चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटू आणि विश्लेषकांकडून टीका सहन करावी लागत आहे. या यादीत अंतिम सामन्यात पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांचाही समावेश झाला आहे. त्यांनी भारतीय संघाच्या पराभवावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रमीज राजा?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे रमीज राजा (Ramiz Raja) यांनी भारतीय संघाच्या पराभवानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आपण स्वत:वर संशय घेत असतो. तुम्ही पाहा की, जागतिक क्रिकेट किती मागे राहिलंय आणि पाकिस्तान किती पुढे निघाला आहे. तुम्ही पाहा, या विश्वचषकात दिसेल की, बिलियन डॉलर इंडस्ट्री असणारे संघही मागे राहिले आहेत आणि आम्ही पुढे गेलो आहोत. अशात आम्ही कुठेतरी चांगलं काम करत आहोत. त्यामुळे तुम्हीही आनंद साजरा करा आणि आदर करा. याच संघातून मागील महिन्यात तीन खेळाडू आयसीसीचे सर्वोत्तम खेळाडू निवडले गेले आहेत.”
पाकिस्तानचा या टी20 विश्वचषकातील प्रवास
पाकिस्तान संघाने या टी20 विश्वचषकातील आपले सुरुवातीचे दोन सामने भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध गमावले होते. यानंतर पाकिस्तानने दमदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि बांगलादेश संघांना पराभूत करत उपांत्य सामन्यात जागा मिळवली. यादरम्यान पाकिस्तान संघ नेदरलँड्सच्या दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे अंतिम चारमध्ये पोहोचला. यानंतर उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघावर सहजरीत्या विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात धडक दिली.
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडमध्ये अंतिम सामना
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. आता या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टी20 विश्वचषक 2022चे विजेतेपद कोणता संघ जिंकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (pakistan cricket board chief ramiz raja billion dollar team remark for indias performance in t20 world cup 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाची पाठराखण केल्यानंतर सचिन होतोय ट्रोल; चाहते म्हणतायेत…
माजी इंग्लिश कर्णधाराची भारतावर सडकून टीका! म्हणाला, “एकदिवसीय विश्वचषकानंतर त्यांनी काय केलय?”