---Advertisement---

पाकिस्तान संघ भक्कम बनवण्यासाठी वहाब रियाज झटणार! निवृत्तीनंतर PCBने दिली प्रमुख निवडकर्त्याची जबाबदारी

Wahab Riaz Shane Watson
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटमध्ये मागच्या काही दिवसात महत्वाचे बदल पाहायला मिळाले. भारतात झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ विजेतेपदाचा दावेदार होता. पण उपांत्य फेरीच्या आधीच पाकिस्तान संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. परिणामी नुकतीच दोन नव्या कर्णधारांची नियुक्ती पाकिस्तान संघात केली गेली. शुक्रवारी (17 नोव्हेंबर) पाकिस्तान क्रिकेटच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू वहाब रियाज याला नियुक्त केले गेले.

वनडे विश्वचषक 2023 (णऐण 2023) मध्ये पाकिस्तान संघ 9 सामन्यांपैकी 4 सामन्यात विजय मिळवू शकला. 5 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि स्पर्धेचा शेवट त्यांनी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर केला. उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चार संघांमध्ये पाकिस्तानचे नाव नव्हते. परिणामी पाकिस्तान क्रिकेटने काही मोठी पावले उचलली. बुधवारी (15 नोव्हेंबर) बाबर आझम याने तिन्ही क्रिकेट प्रकारांमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अवघ्या काही वेळात संघाला दोन नवे कर्णधार मिळाला. शाहीन आफ्रिदी याला टी-20 मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये, तर शान मसूद याला कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे कर्णधारपद दिले गेले आहे.

पाकिस्तान संघाला डिसेंपर आणि जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका, तर न्यूझीलंडसोबत पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशात या मा दोन्ही मालिकांसाठी वहाब रियाझ याच्या नेतृत्वातील निवड समितीला संघ निवडावा लागणार आहे. माजी दिग्गज इंजमाम उल हक यांनी निवड समितीचे अध्यक्षपद सोडल्यानंतर वहाब रियाझला ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वहाबने याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. निवड समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती झाली असली तरी समितीमधील इतर सदस्य अद्याप निश्चित झाले नाहीत, असे सांगितले जात आहे.

त्याचसोबत पाकिस्तान क्रिकेटच्या संचालकपदी माजी दिग्गज मोहम्मद हाफिज याची नियुक्ती केली गेली. असेही सांगितले गेले आहे की, आर्थर किंवा ब्रँडबर्न संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नसतील. मोहम्मद हाफिज सध्या संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. पुढच्या दोन मालिकांनंतर पाकिस्तान संघाला नवा प्रशिक्षक मिळू शकतो. 30 डिसेंबर रोजी पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होईल.

महत्वाच्या बातम्या – 
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन टॅलेंट सिरीजमध्ये देशभरांतून 140हून अधिक खेळाडू सहभागी
World Cup 2023 Final: ‘भारत वर्ल्डकप जिंकला, तर पुढच्या सिनेमात 11 नवे कलाकार घेईल’, वाचा कुणी दिलाय शब्द

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---