---Advertisement---

टी२० वर्ल्डकपमधील पराभवानंतर पाकिस्तानची नवीन सुरुवात, खेळाडूंच्या फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल

On: शुक्रवार, नोव्हेंबर 19, 2021 4:15 PM
---Advertisement---

नुकताच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा समारोप झाला. या स्पर्धेत बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने जबदरस्त कामगिरी केली होती. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. त्यावेळी या संघाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तान संघाला पराभूत केले. या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना मोठा धक्का बसला होता. पण आता या पराभवाच्या धक्क्यातून बाहेर येत, पाकिस्तान संघ नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे.

सध्या पाकिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका आणि त्यानंतर २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी२० मालिकेने होणार आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) पार पडणार आहे. हा सामना शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये पार पडणार आहे.

बांगलादेश संघाविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेपूर्वी पाकिस्तान संघातील खेळाडू फोटोशूट करताना दिसून आले. यावेळी पाकिस्तान संघातील दिग्गज खेळाडू तेथे उपस्थित होते. या आनंदाच्या क्षणाचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेटने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली दिसून येत आहे. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम देखील फोटो क्लिक करताना दिसून येत आहे.

https://twitter.com/TheRealPCB/status/1461298236925353993?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1461298236925353993%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fhindi%2Fcricket%2Fpakistan-cricketers-got-photoshoot-done-watch-video-2616866

या व्हिडिओ वर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत. एका चाहत्याने शाहीन आफ्रिदीचा फोटो शेअर करत लिहीले की, “भाऊ, चांगला फोटो काढा इन्स्टाग्रामवर टाकायचा आहे.” तर अनेकांनी २३ वर्षीय युवा गोलंदाज शाहनवाज धनीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्याला राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘आठवत नाही की, त्याने कारकिर्दीत कधी खराब चेंडू फेकला असेल’, न्यूझीलंडच्या सलामीवीराकडून अश्विनचे कौतुक

‘एबी’ची सर्वप्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्ती, विराट म्हणाला ‘आय लव्ह यू’; पण तुटलेल्या हृदयासह

भज्जीचा नवा लूक! यष्टीरक्षण करताना अप्रतिम झेल घेताच हरभजनने केला भांगडा, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---