यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोमांचक सामन्यांचा थरार पाहायला मिळत आहे. मंगळवारी (२ नोव्हेंबर) या स्पर्धेत बलाढ्य पाकिस्तान संघाचा सामना नामिबिया संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात पहिल्यांदाच टी -२० विश्वचषक स्पर्धा खेळत असलेल्या नामिबिया संघाला ४५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तर या विजयासह पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोरदार प्रवेश केला आहे. या विजयानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी देखील आपल्या प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.
बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारत, न्यूझीलंड, अफगानिस्तान आणि नामिबिया संघाला पराभूत करत सलग ४ सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तान संघाची ही कामगिरी पाहता पाकिस्तान संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच चाहते आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर देताना दिसून येत आहेत.
एका युजरने ट्विट करत लिहिले की, “सलग ४ सामन्यात विजय, पाकिस्तान संघ नक्कीच जगावर चांगला प्रभाव टाकत आहे, एकच तर हृदय आहे किती वेळेस जिंकणार.” तसेच अनेकांनी पाकिस्तान संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नामिबिया संघाच्या लढवय्या वृत्तीचे देखील कौतुक केले जात आहे. एका युजरने ट्विट करत लिहिले की, “अभिनंदन पाकिस्तान संघ, नामिबिया संघाने देखील चांगला खेळ दाखवला.”
तसेच अनेकांनी डेविड विसेचे देखील कौतुक करत लिहिले की, “एक संपूर्ण सामना एकीकडे आणि डेविड विसेचा षटकार एकीकडे, खूप मोठा षटकार होता.” तसेच अनेकांना असेही वाटत आहे की, नामिबिया संघ भारतीय संघाला पराभूत करू शकतो. एका युजरने लिहिले की, “८ नोव्हेंबर रोजी नामिबिया संघ खतरा बनू शकतो.” ८ नोव्हेंबर रोजी भारतीय संघाचा सामना नामिबिया संघाविरुद्ध होणार आहे.
https://twitter.com/fanu_tweets/status/1455591040900009994?t=_U7Ao2E9fvdb5GehTII-og&s=19
https://twitter.com/H2S04___tweets/status/1455591023107739653?t=5pkVx4KWO3KVqN5qkZFnzw&s=19
https://twitter.com/inketweets/status/1455590947694145537?t=ucNkrRB_sj4ZjciPC2jJhQ&s=19
https://twitter.com/sameera_01/status/1455590898797006855?t=A8GQqx9f8E3PtFfOMpXa1g&s=19
https://twitter.com/Afreenwhysomean/status/1455590896913821698?t=TMZRapINdTQw91oUFGgNXQ&s=19
https://twitter.com/Subhasi03568072/status/1455592130131337223?t=mTmQUBZ5TacIpJS9KFb1OQ&s=19
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाला २० षटक अखेर २ बाद १८९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नामिबिया संघाला २० षटक अखेर ५ बाद १४४ धावा करण्यात यश आले. हा सामना पाकिस्तान संघाने ४५ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ब्रेकअप झालाय का?’ शुबमन गिलच्या ‘या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण
‘तो विवियन रिचर्ड्सप्रमाणे विध्वंसक खेळ करतो’, शेन वॉर्नने ‘या’ फलंदाजाचे गायले गोडवे
टी२०मध्ये बाबर आझम ‘कर्णधार’ विराट कोहलीला ठरतोय सरस, आता ‘या’ विक्रमात दिला धोबीपछाड






