भारतीय संघाने गुरुवारी (8 सप्टेंबर) अफगाणिस्तान संघाविरुद्ध मोठा विजय मिळवला. विराट कोहली याने या सामन्यात 61 चेंडूंमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 122 धावा केल्या. विराटच्या या वादळी खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 101 धावांनी जिंकला. विराटने तब्बल दोन वर्षा आणि 10 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय शतक केल्यामुळे त्याचे महत्व खूपच जास्त आहे. ज्या चाहत्यांनी स्टेडियममधून हा सामना लाईव्ह पाहिला, त्यांना हा अनुभव कधीच विसरता येणार नाही. अशाच एका चाहत्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे, ज्याला या महत्वाच्या सामन्यात विराटने स्वक्षरी केलेली बॅट भेट भेट म्हणून मिळाली आहे.
क्रीडा पत्रकार विमल कुमार (Vimal Kumar) यांनी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. पत्रकार विमल कुमारसोबत चर्चा करताना या चाहत्यांने खुलासा केला की, त्याने विराटकडून ही अमूल्य भेटवस्तू मिळवली आहे. त्याने असेही सांगितले की, तो ही बॅठ नेहमी त्याच्या संग्रहात ठेवणार आहे. चाहता म्हणाला की, “माझ्या हातात जी ही बॅट आहे ती विराट कोहली भैयाने स्वाक्षरी करून मला भेट म्हणून दिली आहे. मी खूप भाग्यवान आहे. त्याने आजच शंबर धावा केल्या आहेत आणि यूएईतील त्याचा शेवटचा सामना होता. त्यामुळेच मला हे गिफ्ट मिळाले. मी तर फक्त त्याच्याकडे एक खास रिक्वेस्ट केली होती आणि त्याने ऐकले देखील.”
विराटने स्वक्षरी केलेली बॅट म्हणजे त्याला किंवत तर केली जाणारच. ततही त्याने जबळपास तीन वर्षांच्या काळानंतर शतक केले आणि अशा खास दिवशी त्याची स्वक्षरी मिळाल्यामुळे त्याला अधिकचे महत्व सहाजिक आहे. पत्रकराने जेव्हा त्याला ही बॅट विकण्याचा काही विचार आहे का? असा प्रश्न विचारला, तेव्हा चाहत्याने स्वष्ट केले की, तो कुठल्याही किमतीत ही बॅट विकणार नाहीये. तो म्हणाला की, “एकजण एथेच उभा होता आणि त्यांनी मला या बॅटसाठी 4000-5000 दिरहम (1 दिरहम म्हणजे अंदाजे 21 भारतीय रुपये.) देत होते. पण मला ही विकायची नाहीये. एखादा 5 लाख दिरहम (अंदाजे एक कोटी पेक्षा जास्त) देत असेल, तरीही मी ही बॅट विकणार नाही.”
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. मर्यादित 20 षटकात भारताच्या 2 विकेट्स गेल्या आणि संघ 212 धावापर्यंत मजर मारू शकला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान 20 षटकात 8 विकेट्सच्या नुकसानावर 111 धावा करू शकला. आता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषकाचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार करणार निवृत्तीची घोषणा
जडेजाच्या विरोधात रचला गेला कट? ‘त्यामुळे’ नाही खेळणार टी-20 विश्वचषक
VIDEO | हे काय? पाकिस्तानी चाहत्यांची कुटाई केली, पण भारतीयांच्या गळ्यात पडून सामना पाहत होते अफगाणी चाहते