जवळपास १० महिन्यांच्या अंतरानंतर भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी दोन हात करणार आहेत. टी२० विश्वचषक २०२१ मध्ये २४ ऑक्टोबरला दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शेवटचा सामना झाला होता. या सामन्यानंतर आता २८ ऑगस्टला पुन्हा दुबईच्याच मैदानावर उभय संघ भिडणार आहेत. मात्र यावेळी भारताचे पारडे जड आहे. कारण पाकिस्तान संघात अनुभवी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याची कमी आहे, जो भारतासाठी कर्दनकाळ ठरला होता. यावरून एका पाकिस्तानी चाहत्याने रोहितला नम्र विनवणी केली आहे.
आफ्रिदीने (Shaheen Afridi) मागील टी२० विश्वचषकातील सामन्यात भारतीय संघावर ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या सामन्यात त्याने कर्णधार रोहित शर्माबरोबर विराट कोहली, केएल राहुल यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. या मॅच विनिंग प्रदर्शनासाठी आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. परंतु आता हाच मॅच विनर आशिया चषकासाठी अनुपलब्ध असेल. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण आशिया चषकातून (Asia Cup 2022) बाहेर झाला आहे.
त्याच्यापाठोपाठ मोहम्मद वसिमही दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाल्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाजी विभाग कमजोर पडला आहे. याचा फायदा भारतीय संघाला होणार आहे. त्यातही टी२० क्रिकेट स्वरूपात हातखंडा असल्याने रोहित (Rohit Sharma) पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. याचमुळे एका पाकिस्तानी चाहत्याने रोहितला पाकिस्तानविरुद्ध हलक्या हाताने (Pakistani Fan Request To Rohit Sharma) फलंदाजी करण्याची विनंती केली आहे.
शुक्रवारी (२६ ऑगस्ट) संध्याकाळी रोहितने दुबईच्या आयसीसी अकादमीत सराव केला. यादरम्यान त्याला भेटण्यासाठी भरपूर चाहत्यांनी गर्दी केली होती. यामध्ये काही पाकिस्तानी चाहतेही होते. त्यापैकी एका चाहत्याने पत्रकार विमल कुमार यांच्या यूट्यूबवरील व्हिडिओत रोहितला विनंती केली आहे.
“गेल्या १०-१५ वर्षांत रोहितने ज्या दर्जाने फलंदाजी केली आहे, तो अजूनही कायम आहे. याचमुळे आम्ही त्याला हाक मारली आणि म्हटले की, आम्ही पाकिस्तानचे आहोत. हे ऐकून रोहित लगेचच आम्हाला भेटायला आला. त्याने आम्हाला मिठीही मारली. ही संधी साधत आम्ही त्याला म्हणालो, यावेळी थोडा हात हलका ठेव. कारण आमचे गोलंदाज नवीन आहे. शाहीन आणि आमिर भाई (मोहम्मद आमिर) नाहीत,” असे त्या चाहत्याने म्हटले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: आशिया चषकाच्या उद्घाटनासाठी राशिदचा ‘स्नेक’ तयार; खास शॉटचा करतोय सराव
‘तो खतरनाक होता आणि आजही आहे…’, पाकिस्तानचा प्रशिक्षक जाणतो विराटची मैदानावरील ‘दहशद’
पाकिस्तानची खैर नाही! आशिया चषकासाठी भारताने १० महिन्यांपूर्वीच बनवून ठेवलेला ‘हा’ मास्टरप्लॅन






