आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने आपला दुसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध गमावला. भारताविरूद्ध पहिल्या सामन्यात चार विकेट्सने पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी संघ झिम्बाब्वे संघाविरूद्ध देखील विजयाची नोंद करू शकला नाही. या सामन्यात शेवटी अवघ्या एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे व्यथित झालेल्या पाकिस्तानी चहा त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याच्या तंदुरुस्तीमुळे देखील बोर्डावर टीका होताना दिसतेय.
पाकिस्तान संघाला झिम्बाब्वेकडून अटीतटीच्या सामन्यात एका धावेने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे संघाच्या उपांत्य फेरीचा आशा अगदी अंधुक झाल्या आहेत. या सामन्यात पाकिस्तानला जिंकण्यासाठी अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. मात्र, शाहिन शाह आफ्रिदी व मोहम्मद वसिम त्या चेंडूवर केवळ एक धाव घेऊ शकले. यादरम्यान आफ्रिदी धावबाद झाला. आफ्रिदी त्या चेंडूवर धावताना काहीसा अवघडलेला दिसला. याच कारणाने अनेकांनी पाकिस्तान बोर्डाला धारेवर धरले. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले,
Not even 50% fit https://t.co/2feoqPFfVD
— Potato (@PotatoPvtLtd) October 28, 2022
‘शाहीन शाह पहा कसा धावतोय? केवळ मुर्खांना हे दिसत नाही.’ तर काहींनी आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याला संघात स्थान दिल्याने टीका केली आहे. आफ्रिदी या विश्वचषका आधी तीन महिने कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळला नव्हता. पायाच्या दुखापतीमुळे आशिया चषक, इंग्लंड विरुद्धची मालिका तसेच न्यूझीलंडमधील तिरंगी मालिकेत त्याने सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला.
लागोपाठ झालेल्या दोन पराभवानंतर पाकिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची समीकरणे जरा अवघडच झाली आहेत. यानंतर त्यांचा सामना 30 ऑक्टोबरला नेदरलॅंड्ससोबत पर्थ याठिकाणी आहे. जर या सामन्यात पाकिस्तान विजय मिळवण्यात यशस्वी झाला तरचं, त्यांची उपांत्य फेरीत पोहचण्याची आशा पल्लवीत राहील. त्यानंतर पाकिस्तानचा सामना दक्षिण अफ्रीका आणि बांगलादेश या संघाशी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तानकडे खराब कर्णधार’, बाबर आझमबद्दल बोलताना घसरली शोएब अख्तरची जीभ
सामन्यापूर्वी पत्नीचा ‘हा’ नियम पाळतो सूर्यकुमार, फलंदाजीला उतरताच करतो गोलंदाजांचं काम तमाम