यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) पाचवा सामना भारत-पाकिस्तान संघात खेळला जाईल. रविवारी (23 फेब्रुवारी) रोजी भारत आणि पाकिस्तान संघात अटीतटीचा सामना पाहायला मिळेल. दरम्यान दोन्ही संघ दुबईच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) मोठे वक्तव्य केले आहे.
कराची येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करल्यानंतर, 8 संघांच्या या स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला भारताला हरवावे लागेल. बांगलादेशविरुद्ध 6 विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ या उच्च-दबावाच्या सामन्यात उतरेल.
हारिस रौफ (Haris Rauf) म्हणाला, “भारताविरुद्धच्या सामन्यात कोणताही दबाव नाही, सर्व खेळाडू आरामशीर आहेत आणि आम्ही इतर कोणत्याही सामन्याप्रमाणे हा सामना घेऊ. आम्ही दुबईत भारताला दोनदा हरवले आहे, त्यामुळे आम्हाला येथील परिस्थिती चांगली माहिती आहे. आमचा संपूर्ण प्लॅन सामन्याच्या दिवसाच्या परिस्थिती आणि खेळपट्टीवर अवलंबून असेल.”
पुढे बोलताना रौफ म्हणाला, “हो, सॅम अयुब आणि आता फखर झमानची अनुपस्थिती चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमच्यासाठी मोठा धक्का आहे. पण आमच्याकडे अजूनही असे खेळाडू आहेत जे चांगली कामगिरी करू शकतात आणि या स्पर्धेत आम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक खेळाडूला हे समजते की भारताविरुद्धच्या सामन्यात हिरो बनण्याची उत्तम संधी आहे, परंतु जर त्यांनी संयम राखला आणि चांगली कामगिरी केली तरच हे शक्य होईल.”
आयसीसी चॅम्पियन्स ट्राफीसाठी दोन्ही संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आगा, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy; भारत-पाकिस्तान सामन्यात कोण मारणार बाजी? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी
RCB vs MI: एलिसे पेरीचे झंझावाती अर्धशतक! मुंबईसमोर 168 धावांचे आव्हान
क्रिकेटप्रेमी सज्ज! चॅंपियन्स ट्रॉफीमध्ये होणार चुरशीची लढत






