पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हसन अली गोलंदाजीसोबतच त्याच्या सेलिब्रेशनसाठी देखील ओळखला जातो. 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विकेट घेतल्यानंतर तो आनंद साजरा करताना जखमी झाला होता. सेलिब्रेशन करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. आता पुन्हा एकदा हसन अलीनं विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना स्वतःला दुखापत करून घेतली आहे. यावेळी त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
टी20 विश्वचषक 2024 साठी पाकिस्तान संघात स्थान मिळवू न शकलेला हसन अली सध्या टी20 ब्लास्टमध्ये वॉर्विकशायरकडून खेळत आहे. या स्पर्धेत नॉटिंगहॅमशायरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हसन अलीनं विकेट घेतल्यानंतर त्याचं प्रसिद्ध ‘जनरेटर’ सेलिब्रेशन केलं, जे त्याला महागात पडलं आहे. यावेळी सेलिब्रेशन करताना तो पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हसन अली फलंदाजाला यॉर्कर चेंडूवर बोल्ड करतो आणि सेलिब्रेशन करतो. मात्र त्यानंतर तो त्याच्या बरगड्या पकडून खाली बसतो. सेलिब्रेशन केल्यानंतर हसन अली खूपच अस्वस्थ दिसत आहे. या सामन्यात हसन अलीनं नॉटिंगहॅमशायरच्या ऑली स्टोनला बोल्ड केलं, जो केवळ 3 धावा करून बाद झाला. 2018 मध्येही हसन अलीसोबत असंच घडलं होतं, जेव्हा सेलिब्रेशन करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. हे दोन्ही व्हिडिओ इथे पहा.
Hasan Ali gets Deja Vu. 🤣 pic.twitter.com/DERMOw8jkF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 3, 2024
वॉर्विकशायर आणि नॉटिंगहॅमशायर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हसन अलीच्या संघानं म्हणजेच वॉर्विकशायरनं 22 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना वॉर्विकशायर संघ 19.3 षटकांत 149 धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना नॉटिंगहॅमशायरचा संघ 19.2 षटकांत 127 धावांत ऑलआऊट झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयर्लंडला हलक्यात घेणं परवडणारं नाही, टीम इंडियासाठी ‘हे’ 5 खेळाडू ठरू शकतात धोकादायक
93 कोटींची एकूण बक्षीस रक्कम, विजेत्यावर होणार पैशांचा वर्षाव; टी20 विश्वचषकातून कोणताही संघ रिकाम्या हातानं परतणार नाही!
चेंडू चुकून लागल्यानंतर गोलंदाजानं बाद केलं नाही, अशी खिलाडूवृत्ती क्रिकेटमध्येच दिसते! पाहा VIDEO