पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) (बुधवारी 21 ऑगस्टपासून) बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. याआधी, त्यानं (जुलै 2023) मध्ये पाकिस्तानसाठी शेवटची कसोटी खेळली होती. आता तब्बल वर्षभरानंतर कसोटीत पुनरागमन करण्यापूर्वी नसीमनं एका मुलाखतीत अनेक गोष्टींबद्दल भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
नसीम शाह (Naseem Shah) म्हणाला, “क्रिकेटपटूच्या आयुष्यात पडद्यामागे बरेच काही घडत असते, ज्याची लोकांना माहिती नसते. कधी कधी तुम्ही फक्त आनंदाचे छोटे क्षण शोधता. माझ्या वडिलांचा एक काळ असा होता की, त्यांना क्रिकेटबद्दल काहीच माहिती नव्हते. पण आता आम्ही हरलो तरी ते अस्वस्थ होतात, म्हणून मी प्रत्येक मोठ्या सामन्यापूर्वी माझ्या भावाला कॉल करतो. कारण आमच्या वडिलांना ते दिसत नाही याची खात्री करण्यासाठी, मला भीती वाटते की यामुळे काही मोठ्या समस्या उद्भवू शकतात. यावेळी असं वाटतं की, मी एकाच वेळी दोन सामने खेळत आहे.”
नसीम शाह (Naseem Shah) पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज आहे. नसीम हा पाकिस्तानच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्यानं 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. नसीमनं आतापर्यंत 17 कसोटी, 14 एकदिवसीय आणि 28 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यानं 33.82 च्या सरासरीने 51 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, त्यानं एकदिवसीय सामन्यात 16.96च्या सरासरीनं 32 विकेट्स आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 32.75 च्या सरासरीने 24 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीसोबत फोटो घेण्यासाठी खूप इच्छुक ‘ही’ महिला खेळाडू
बुमराहला विश्रांती तर रिषभ पंतच पुनरागमन; बांग्लादेश मालिकेसाठी या 15 खेळाडूंच नशीब उजळणार
ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवायला येतोय ‘हा’ दिग्गज गोलंदाज, जय शाहांनी केलं खळबळजनक वक्तव्य!