पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने खास पराक्रम गाजवला आहे. रविवारपासून (दि. 16 जून) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात गोलंदाजीला उतरताच आफ्रिदीने दुसऱ्या षटकात विकेट घेत खास विक्रम नावावर केला. यासह तो अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा 19वा खेळाडू ठरला.
शाहीन आफ्रिदी 100 विकेट्स घेण्यात यशस्वी
वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) श्रीलंका संघाच्या डावातील तिसरे षटक टाकत होता. हे त्याचे डावातील वैयक्तिक दुसरे षटक होते. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने सलामी फलंदाज निशान मदुष्का (Nishan Madushka) याला यष्टीरक्षक सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) याच्या हातून झेलबाद केले. ही विकेट घेताच कसोटीत शाहीन आफ्रिदी 100 विकेट्स पूर्ण करण्यात यशस्वी झाला. यासोबतच तो कसोटीत 100 विकेट्स घेणारा पाकिस्तानचा 19वा खेळाडू बनला.
कसोटीसाठी एक वर्षानंतर मैदानात
पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तान संघाने गोलंदाजीला सुरुवात केल्यानंतर 23 वर्षीय आफ्रिदीने अधिकृतरीत्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तो जवळपास 1 वर्षानंतर पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेट खेळत आहे. मागील वर्षी गाले मैदानात खेळताना श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
https://twitter.com/zaidhassan89/status/1680444341066825728?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1680444341066825728%7Ctwgr%5E1aec55b902b325b2297394c20e40d4bcc13db468%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-shaheen-afridi-completes-100-test-wickets-in-comeback-match-watch-video-sl-vs-pak-1st-test-8444773.html
वेगवान गोलंदाजाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या पुरुषांच्या टी20 विश्वचषकात पुनरागमन केले होते. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी तसेच वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता.
आफ्रिदीचे वक्तव्य
माध्यमांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला होता की, “जिथे मी दुखापतग्रस्त झालो, होतो त्या देशात मी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी खूपच उत्सुक होतो. दुखापत ही खेळाडूच्या आयुष्याचा भाग आहे. मात्र, पुनरागमन करणे चांगले आहे. मी कसोटी क्रिकेटचा खूपच आनंद घेतो. मी कसोटीत शतक करण्यापासून एक विकेट दूर आहे, ही माझ्यासाठी मोठी कामगिरी असेल.”
विशेष म्हणजे, 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी निवड होण्यापूर्वी आफ्रिदी इंग्लंडमध्ये नॉटिंघमशायर संघासाठी खेळत होता. (pakistan fast bowler shaheen afridi took 100th test wicket)
महत्वाच्या बातम्या-
दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या सरफराजसाठी दिग्गज पाँटिंगही हळहळला; म्हणाला, ‘मला त्याच्यासाठी…’
IPL Auctionमध्ये खरेदी न केल्याने RCBवर संतापलेला चहल, बोलणंही केलं होतं बंद; स्वत:च केला खुलासा