---Advertisement---

टॉस जिंकत बाबर आझमचा गोलंदाजीचा निर्णय, संघात केला धक्कादायक बदल; ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग

On: शुक्रवार, ऑक्टोबर 20, 2023 1:38 PM
PAK-vs-AUS
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 18व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघ आमने-सामने आहेत. उभय संघातील हा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला.

पाकिस्तान संघात एक मोठा बदल आहे. शादाब खान या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी उसामा मीर याची ताफ्यात एन्ट्री झाली आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया संघात कुठलाही बदल झाला नाहीये.

उभय संघांची स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघांच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर दोघांनी प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया संघाला 2 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर पाकिस्तान संघ 1 वेळा पराभूत झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने पहिला सामना भारताविरुद्ध खेळला होता, जो त्यांना 6 विकेट्सने गमवावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिका संघाने 134 धावांनी पराभूत केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सामना श्रीलंकेशी झाला, ज्यात त्यांना 5 विकेट्सने विजय मिळवण्यात यश आले.

दुसरीकडे, पाकिस्तान संघाने पहिल्या सामन्यात नेदरलँड्स संघाचा 81 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 6 विकेट्सने विजय साकारला. मात्र, त्यांना विजयाची हॅट्रिक करता आली नाही. तिसऱ्या सामन्यात त्यांना भारतीय संघाविरुद्ध 7 विकेट्सने पराभूत व्हावे लागले.

अशात आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघ आपल्या चौथ्या सामन्यात आमने-सामने आहेत. आता हा सामना कोणता संघ जिंकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Pakistan have won the toss and have opted to field against australia)

विश्वचषकातील 18व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड

पाकिस्तान
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ

हेही वाचा-
पंड्याबाबत धक्कादायक ब्रेकिंग! बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध खेळणार की नाही? खुद्द बीसीसीआयने दिली माहिती
विराटला करायचे नव्हते शतक, पण राहुलने कशी घातली समजूत? स्वत:च केलाय खुलासा, लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---