दिग्गज खेळाडू बासित अलीने शोएब मलिकवर मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केल्याने पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा लाजिरवाणे झाले आहे. मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमिर आणि सलमान बट यांच्यावर काही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या फिक्सिंगच्या आरोपांची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. बासित अलीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शोएबवर आरोप केला आहे की, त्याने आपल्या टीमला जाणूनबुजून पराभूत केले.
बासित अलीने 2005 मध्ये झालेल्या राष्ट्रीय टी-20 चषकाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणला आहे. दिग्गज पाकिस्तानी खेळाडूने त्या स्पर्धेतील सियालकोट स्टॅलियन्स विरुद्ध कराची झेब्रास सामन्याची आठवण केली. ज्यामध्ये स्टॅलियन्सला शेवटच्या 4 षटकांमध्ये फक्त 25 धावा करायच्या होत्या. स्टॅलियन्सचा कर्णधार शोएब मलिक अर्धशतक झळकावल्यानंतर क्रीजवर होता आणि त्याचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता. मलिक 53 चेंडूत 88 धावा करून नाबाद परतला. तरीही त्याचा संघ 4 धावांनी सामना हरला. त्यामुळे स्टॅलियन्स आणि मलिक यांच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
सामन्यानंतर एका मुलाखतीत शोएब मलिकने आपल्या डावाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असला तरी. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे लोकांना फार कठीण वाटले. त्यानंतर मलिकला दंडही ठोठावण्यात आला. बासित अली इथेच थांबला नाही कारण त्याने चॅम्पियन्स एकदिवसीय चषक 2024 मध्ये मलिकला स्टॅलियन्सचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) देखील लक्ष्य केले.
पाकिस्तानी संघातील खेळाडूंचा मॅच फिक्सिंगशी दीर्घकाळ संबंध आहे. मोहम्मद आसिफ, सलमान बट आणि मोहम्मद आमिर यांच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने सर्वाधिक चर्चेचा विषय बनवला होता. त्यांच्याशिवाय मोहम्मद इरफान, खालिद लतीफ आणि आकिब जावेद यांच्यासह अनेक पाकिस्तानी खेळाडूंची नावे मॅच फिक्सिंग प्रकरणात जोडली गेली आहेत.
हेही वाचा-
ट्रॅव्हिस हेडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव; इंग्लंडची मालिकेत बरोबरी
“रोहित लगान सिनेमातील आमिर खान सारखा”, युवा फलंदाजाने उधळली स्तुतीसुमने
IPL 2025 मध्ये धोनी खेळणार का? लवकरच होणार घोषणा