14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मिर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाही हल्ल्याचे तीव्र पडसाद जगभरात उमटत आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आयएमजी-रिलायंस (IMG Reliance) ने पाकिस्तान सुपर लीगचा(पीएसएल) प्रसारण करार मागे घेतला आहे. याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डने रविवारी माहिती दिली आहे.
सध्या सुरक्षिततेच्या कारणाने संयुक्त अरब अमिराती येथे सुरु असलेल्या पीएसएलचे प्रसारण आयएमजी-रिलायंस कंपनी करत होते. तसेच लाहोर आणि कराची येथे या स्पर्धेतील होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यांचेही प्रसारण ही कंपनी करणार होती.
या कंपनीच्या माध्यमातून विविध चॅनेल पाकिस्तान आणि अन्य देशात पीएसएलचे प्रसारण करत होते. भारतात डीस्पोर्ट या चॅनेलवर पीसीएलचे प्रसारण होत होते.
आयएमजी-रिलायंसच्या एका अधिकारीने सांगितले की इमेलच्या माध्यमातून प्रसारण करार मागे घेण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवला आहे. तसेच या अधिकारीने सांगितले, ‘पुलवामामध्ये जो हल्ला झाला तो पाहता पाकिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक व्यवहार होऊ शकत नाही. त्यामुळे रविवारी पीएसएलचे प्रोडक्शन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.’
या निर्णयानंतर पीसीबीने सोमवारी या स्पर्धेसाठी नवीन प्रसारकाची घोषणा करण्यात येईल असे सांगितले आहे.
पीसीबीचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान यांनी म्हटले आहे की ,’आम्ही लवकरच नवीन प्रसारकाची घोषणा करु. पीसीबीने मागील दिवसीतील घटनाक्रमांर लक्ष दिले आहे आणि यावर निराशाही व्यक्त केली आहे. आमचे नेहमीच असे म्हणणे आहे की खेळ आणि राजकारणाला वेगवेगळे ठेवले जावे. या महिन्याच्या शेवटी दुबईमध्ये होणाऱ्या बैठकीत बीसीसीआय समोर या प्रकरणावर चर्चा केली जाईल.’
PCB's statement on the production of the Pakistan Super League #PSL2019 #PSL4 pic.twitter.com/e4S6aduxBi
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) February 17, 2019
मागील काही वर्षात बीसीसीआय भारत आणि पाकिस्तान संघात द्विपक्षीय मालिका घेण्यासाठी नकार देत असल्याने हे दोन संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने-सामने येतात. हे दोन संघ शेवटचे मागील वर्षी एशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानबरोबर खेळायला नको
–चाहत्यांकडून एबी, कोहलीच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक, पहा व्हिडीओ
–विराट, रोहित आणि धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये हा आहे मोठा फरक