---Advertisement---

पाकिस्तानचा भारतावर ‘यू-टर्न’; मंत्र्याने म्हटले, ‘न्यूझीलंड संघाला धमकीचा ईमेल भारतातून पाठवला गेला’

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 3:10 PM
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये १७ सप्टेंबरपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार होता. परंतु सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पाकिस्तानी चाहत्यांनी आणि दिग्गज खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला न्यूझीलंड संघावर हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली होती, ज्यामुळे त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी या प्रकरणात आता भारतावर निशाणा साधला आहे.

एक आठवड्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने देखील ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तान संघाविरुद्ध होणारी मालिका रद्द केली आहे. यानंतर आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला जो धमकी देणारा ई-मेल आला होता, तो भारतातून आला होता, असा धक्कादायक आरोप पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी केला आहे.

त्यांनी दावा केला आहे की, ज्या ई-मेल आयडीवरून धमकी देणारे मेल पाठवण्यात आले होते, ती आयडी भारतात बनवण्यात आली आहे. तर हा मेल सिंगापूरच्या आयपी ॲड्रेसचा वापर करून पाठवण्यात आला होता. त्यांनी असेही म्हटले आहे की, हा ई-मेल भारतीय डीवाइसचा वापर करून बनवण्यात आला होता. ज्यामध्ये आणखी १३ ई-मेल आयडीचा समावेश आहे. हे ई-मेल अभिनेते आणि कलाकारांच्या नावाने बनवण्यात आले आहेत. चौधरी यांनी म्हटले की, “ज्या ई-मेलवरून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता तो महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रकाश मिश्राच्या नावावर आहे.”

मार्टिन गप्टीलला मारण्याची दिली होती धमकी
फवाद चौधरी यांनी एका भारतीय पत्रकारावर देखील आरोप केले होते. त्यांनी दावा केला होता की, २४ ऑगस्ट रोजी मार्टिन गप्टीलच्या पत्नीला धमकी देणारा ई- मेल पाठवण्यात आला होता. हा ई-मेल तहरीक-ए-लब्‍बैक या नावाने पाठवण्यात आला होता. यामध्ये गप्टीलला जिवे करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी मार्टिन गप्टील पाकिस्तान दौऱ्यावर होता. तसेच ते म्हणाले की, “तपासात उघड झाले की न्यूझीलंड दौरा रद्द झाल्यानंतर, हमजा आफ्रिदीच्या नावाने दुसरा ईमेल पाठवण्यात आला. हा ईमेल आयडी भारतातील होता.”

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाजीत फ्लॉप, त्यात विनाकामी रिव्ह्यूही घालवला वाया; नेटकऱ्यांनी केदारची उडवली खिल्ली

रोहितसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी; पण तो म्हणाला, ‘देवासोबत कोण बोलतं’, पाहा भावनिक प्रसंग

लाईव्ह सामन्यात पंतमुळे फुटलं असतं कोणाचं तरी डोकं, पठ्ठ्यानं केलीच अशी करामत; बघा VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---