आशियाई क्रिकेट मधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेला 31 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका अशा दोन देशात खेळली जाईल. असे असताना भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळेल. या सर्व परिस्थितीत भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव येणार आहे.
या आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानात होणार होते. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तसेच भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या देशाचे दौरे करत नसल्याने तसेच राजकीय संघर्षामुळे या दोघा देशात द्विपक्षीय मालिका होत नाहीत.
त्यामुळे ही स्पर्धा श्रीलंका व पाकिस्तान अशा दोन देशात होईल. मात्र, मूळ आयोजक पाकिस्तान असल्याने सर्व संघांच्या जर्सीवर पाकिस्तानचा उल्लेख केला जाईल. त्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीवर प्रथमच पाकिस्तानचा उल्लेख केलेला दिसून येईल.
भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश एकाच गटात आहे. या दोन संघाव्यतिरिक्त नेपाळ या गटातील तिसरा संघ असेल. त्यानंतर सुपर फोरमध्ये हे दोन्ही संघ दाखल झाल्यास, पुन्हा एकदा त्यांच्या दरम्यान सामना होईल. यापुढे जाऊन अंतिम फेरीत दोन्ही संघांनी प्रवेश केल्यास, चहा त्यांना एकाच स्पर्धेत तिसऱ्यांदा भारत पाकिस्तानचे द्वंद्व पाहायला मिळेल. हे तीनही सामने झाल्यास श्रीलंकेतच होतील.
आशिया चषकासाठी भारतीय संघाचे अद्याप घोषणा झालेली नाही. 2018 मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या वनडे आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर, पाकिस्तान संघ 2012 नंतर प्रथमच आशिया चषक जिंकण्याचा प्रयत्न करेल.
(Pakistan Name On Team India Jersey In Asia Cup)
महत्वाच्या बातम्या-
विराट कोहली का खेळत नाही T20 क्रिकेट? कर्णधार रोहितने सांगूनच टाकले कारण, वाचाच!
रोहितलाच नाही स्वतःच्या निवडीची गॅरंटी! म्हणाला, “प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल”