वनडे विश्वचषक 2023 पासून पाकिस्तान क्रिकेटला सध्या घरघर लागली आहे. संघाची स्पर्धेतील कामगिरी अत्यंत खराब झाली. त्यानंतर निवडसमिती तसेच सपोर्ट स्टाफ बरखास्त केला गेला. कर्णधार बाबर आझम याने देखील आपल्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. संघाला दोन नवे कर्णधार मिळाल्यानंतर आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल देखील एक मोठी बातमी समोर येत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 मध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असून, या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. मात्र, आता पाकिस्तानकडून हे यजमानपद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
PAKISTAN WON'T BE HOSTING 2025 CHAMPIONS TROPHY. (Abhishek Tripathi). pic.twitter.com/gta4KwBawI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 27, 2023
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानात न होता, संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळली जाऊ शकते. बीसीसीआयने विरोध केल्यामुळे ही स्पर्धा इतरत्र खेळली जाईल. तसेच पाकिस्तान यासाठी राजी न झाल्यास हायब्रीड मॉडेलनुसार, काही सामने पाकिस्तानात तर भारतीय संघाचे सर्व सामने व अंतिम सामना युएईमध्ये होईल.
यावर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार होत्या. मात्र, बीसीसीआयच्या विरोधानंतर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार खेळली गेली. त्याचप्रमाणे आता ही स्पर्धा देखील अशा स्वरूपात खेळली जाऊ शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. नुकत्याच संपलेल्या वनडे विश्वचषकात पहिल्या आठ स्थानी राहिलेले संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरलेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इंग्लंड व बांगलादेश यांचा समावेश आहे. 2017 मध्ये झालेल्या अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान संघाने विजय मिळवला होता.
(Pakistan Not Hosting Champions Trophy 2025 Might Be Played In UAE)
हेही वाचा-
IPL 2024: गुजरात टायटन्सचा कर्णधार बनताच शुबमन गिलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘इतक्या चांगल्या…’
IPL ब्रेकिंग! पंड्या मुंबईकडे जाताच Gujarat Titansचे कर्णधारपद ‘या’ पठ्ठ्याकडे, उंचावतील तुमच्याही भुवया