---Advertisement---

न्युट्रल वेन्यूवर खेळला जाणार आशिया चषक 2023! जय शहांनी पाकिस्तानकडून हिरावून घेतले यजमानपद

On: मंगळवार, ऑक्टोबर 18, 2022 8:59 PM
Jay-Shah
---Advertisement---

आशिया चषक 2023 पाकिस्तानमध्ये खेळला जाणार, असे ठरले होते. पण भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाईल की नाही, याविषयी शंका व्यक्त केली जात होता. काही दिवसांपूर्वी आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार, अशा बातम्याही समोर आल्या होत्या. पण बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी पुष्टी केली आहे की, आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही. 

बीसीसीआय सचिवांच्या मते भारतीय संघाला पाकिस्तान दौरा करण्यासाठी सरकारची परवाणगी लागते. याच कारणास्तव बोर्ड यासंदर्भात कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही. पण आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार नाही, ही गोष्ट मात्र त्यांनी स्पष्टच केली आहे. मंगळवारी (18 ऑक्टोबर) बीसीसीआयच्या नवीन कार्यकारिणीची नियुक्ती केली गेली.  जय शहा (Jay Shah) पुन्हा एकदा बीसीसीआयचे सचिव बनले असून रॉजर बिन्नी बोर्डाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत.

आशिया चषकासाठी पाकिस्तान दौरा करण्याबाबत सचिव जय शहांशी बोलले. जय शहा म्हणाले की, “आम्हाला आशिया चषक 2023 न्युट्रल वेन्यूवर (भारतही नाही आणि पाकिस्तानही नाही) हवा आहे. संघाच्या पाकिस्तान दौऱ्याविषयी सरकार निर्णय घेत असते, त्यामुळे आम्ही त्याविषयी बोलणार नाही. पण आशिया चषक 2023 साठी आमचा निर्णय झाला आहे. ही स्पर्धा न्युट्रल व्हेन्यूवर आयोजित केली जाईल.”

दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे. 2017 नंतर ही स्पर्धा पहिल्यांदाच खेळली जाणार आहे. माहितीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद देखील पाकिस्तानकडेच असेल. बीसीसीआयने ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे मागच्याच वर्षीच सांगितले होते. परंतु जय शहांच्या मते चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्येच खेळली जाणार, हे अद्याप ठरले नाहीये. जेव्हा ही गोष्ट निश्चित होईल, तेव्हा बोर्ड त्याविषयी बोलेल, असेही जय शहा म्हणाले.

बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. मागच्या काही वर्षांमध्ये बीसीसीआय बोर्डाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बीसीसीआय सचिवांनी देखील ही गोष्ट मान्य केली आणि देशांतर्गत क्रिकेटपटूंना याचा फायदा व्हावा, असेही त्यांना वाटते. आगामी आशिया चषक पाकिस्तानमध्ये झाला नाही, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा मोठा धक्का असेल. बोर्डाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील सोसावे लागू शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआय अध्यक्ष बनताच रॉजर बिन्नी म्हणाले, “आता हे मी बदलणारच”
चक्क WWE सुपरस्टार ‘द रॉक’ पाहतोय भारत-पाक सामन्याची वाट! बघा काय म्हणतोय  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---