---Advertisement---

साल २०१३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या खेळाडूची ७ वर्षांनी निवृत्तीची घोषणा

---Advertisement---

सध्या पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तिथे न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड संघाने 101 धावांनी जिंकला. परंतु, आता पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू इम्रान फरहत याने सर्व प्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी सलामी फलंदाज इम्रान फरहत याने सर्व प्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इम्रान फरहतने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना बुधवारी(30 डिसेंबर) खेळला. हा सामना तो पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या कैफ ए ट्रॉफीमध्ये बलुचिस्तान संघाकडून सिंध विरुद्ध खेळला.

पाकिस्तान संघासाठी वनडे आणि कसोटी कामगिरी

इम्रान फरहतने पाकिस्तान संघासाठी खेळताना कसोटी आणि वनडे संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 40 कसोटी आणि 58 वनडे सामने खेळले आहेत. त्याने 40 कसोटी सामने खेळताना 32 च्या सरासरीने 2400 धावा केल्या आहे. यामधे त्याच्या बॅट मधून 3 शतके आणि 14 अर्धशतके निघाली आहेत.

त्याचबरोबर वनडे संघाचे प्रतिनिधित्व करताना 58 सामन्यात 30.69 च्या सरासरीने 1719 धावा काढल्या आहेत. त्याने वनडेत 1 शतक आणि 13 अर्धशतके केली आहेत.

पाकिस्तान संघासाठी 2013 साली खेळला होता शेवटचा सामना

इम्रान फरहतने पाकिस्तान संघासाठी शेवटचा सामना 2013 साली खेळला होता. जेव्हा तो चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तान संघासोबत उतरला होता. त्यानंतर पाकिस्तान संघासाठी त्याला खेळायला संधी मिळाली नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्या निवृत्ती माहिती दिली

इम्रान फरहतने आपला शेवटचा सामना बुधवारी बलुचिस्तान संघाकडून खेळला. त्यानंतर त्याच्या निवृत्तीची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून दिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याने दिलेल्या योगदानाचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील कामगिरी

इम्रान फरहतला पाकिस्तान संघाकडून जास्त टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने पाकिस्तान संघासाठी 7 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामधे त्याने 76 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोना काळात गोलंदाजांसाठी ‘ही’ गोष्ट सर्वात कठीण, मार्क बाऊचरने मांडले मत

न्यूझीलंडचा ‘हा’ गोलंदाज दुसऱ्या कसोटीतून बाहेर, पाय फ्रॅक्चर झाला असूनही केलं होतं गोलंदाजीचं धाडस 

“मी तर केवळ फलंदाज अजिंक्य रहाणेला घडवलं, पण तो कर्णधार झाल्याचे श्रेय त्यालाच”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---