---Advertisement---

BREAKING! विश्वचषकाच्या तोंडावर पाकिस्तानला धक्का, स्टार गोलंदाजाकडून अचानक निवृत्तीची घोषणा

Wahab Riaz Pakistan team
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेटचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. वहाब रियाझ मागच्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला नव्हता. जगभरातील लीग क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या संघासाठी 27 कसोटी, 91 वनडे आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने अनुक्रमे 83, 120 आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजाच्या रुपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटणध्ये वहाबने 1200 धावा केल्या आहेत. वहाब रियाझ (Wahab Riaz) याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निरोप घेत असल्याची माहिती चाहत्यांना दिली.

वहाबने आपल्या ट्विटर खात्यावरून पोस्ट शेअर केली की, “मी आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवरून पायउतार होत आहे. क्रिकेट कारकिर्दीतील अविश्वसनीय प्रवासानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी, माझे कुटुंब, प्रशिक्षक, मार्गदर्शक, सहकारी, चाहते आणि मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. येणारा काळ फ्रँचायझी क्रिकेटच्या दृष्टीने रोमांचक असेल!”

यावर्षीच वहाब रियाझने राजकारनात देखील प्रवेश केला. जानेवारी महिन्यात त्याला पंजाब राज्याचा क्रीडामंत्री म्हणून नियुक्त केले गेले होते. तसेच यावर्षीच पाकिस्तान सुपर लीगच्या प्रदर्शन सामन्यात या 38 वर्षीय गोलंदाजाला इफ्तिखार अहमद याने एका षटकात सहा षटकार मारले होते.  (Pakistan pacer Wahab Riaz announced retirement from international cricket)

महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023 । रवी शास्त्री, संदीप पाटील आणि एमएसके प्रसादांनी निवडला भारतीय संघ, वरिष्ठांकडे दुर्लक्ष
मुकेशच्या टीम इंडियातील जागेवर दिग्गजाने ठेवले बोट! म्हणाला, “त्याला कशाला घेतात?”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---