---Advertisement---

भारताविरुद्ध २००७ची फायनल खेळणाऱ्या शोएब, हाफिजला मिळणार संधी! पाहा पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन

On: बुधवार, ऑक्टोबर 20, 2021 10:00 PM
---Advertisement---

टी-२० विश्वचषकात यावेळी भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. दोन्ही संघ आपला पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळतील. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी चांगलीच कंबर कसली आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना २-२ सराव सामने खेळायचे आहेत. यावेळी पाकिस्तान संघ विजेतेपद मिळवण्यासोबतच भारतीय संघाला हरवण्यासाठी सराव करत आहे. त्यानुसारच, पाकिस्तानचे व्यवस्थापनही प्लेइंग-११ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानच्या एका वाहिनीच्या वृत्तानुसार, पाकिस्तान भारतीय संघाविरुद्ध आपल्या अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा मिश्रित असा प्लेइंग ११ संघ मैदानात उतरवेल. सराव सामन्यातही पाकिस्तान व्यवस्थापन देखील अशाच प्रकारे प्लेइंग ११ मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करत आहे.

भारतीय संघाविरुद्ध पाकिस्तानच्या प्लेइंग ११ मध्ये ३ वेगवान गोलंदाज आणि ४ फिरकी अष्टपैलू मैदानात उतरतील. सलामीची जबाबदारी कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्यावर असेल. फखर जमान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरेल. अनुभवी मोहम्मद हफीज, शोएब मलिक आणि आसिफ अली मधली फळी सांभाळताना दिसू शकतील. हाफिज आणि मलिक यांनी २००७ मध्ये भारतीय संघाविरुद्ध अंतिम सामनाही खेळला होता. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता.

त्याचबरोबर शाहीन शाह आफ्रिदी, हसन अली आणि हरीस रौफ वेगवान गोलंदाजी सांभाळतांना दिसतील. यूएईची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. त्यामुळे पाकिस्तान संघात ४ फिरकी अष्टपैलू असतील. या फिरकी गोलंदाजामध्ये उपकर्णधार शादाब खान, इमाद वसीम, शोएब मलिक आणि मोहम्मद हफीज यांचा समावेश असेल.

याच संघाला पाकिस्तान व्यवस्थापनाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात देखील मैदानात उतरवले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून ७ गडी बाद १३० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने १५.३ षटकांत ३ गडी गमावून १३१ धावा करून सामना जिंकला. सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने ४१ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. तर फखर झमानने २४ चेंडूत ४६ धावांची नाबाद खेळी केली होती. शोएब मलिकही ११ चेंडूत १४ धावांवर नाबाद राहिला होता. हाफिजला खातेही उघडता आले नव्हते, तर रिझवानने १३ धावा केल्या होत्या.

भारतीय संघाविरुद्ध पाकिस्तानचा संभाव्य प्लेइंग ११
मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.

महत्त्वाच्या बातम्या-

मेंटर ऑन ड्युटी! धोनी घेतोय रिषभचा क्लास; पाहा व्हिडिओ

विश्वचषकापूर्वी ‘चॅम्पियन’ वेस्ट इंडिजला जबर धक्का; ‘हा’ मॅचविनर झाला संघाबाहेर

डेविड वॉर्नरचा भारतीय सलामीवीर रोहित शर्मावर चक्क चोरीचा आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---