---Advertisement---

पाकिस्तान आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल तर भारत…

On: बुधवार, मे 2, 2018 2:33 PM
---Advertisement---

मुंबई । आयसीसीने आज जाहीर केलेल्या टी२० क्रमवारीत पाकिस्तान संघ १३० गुणांसह अव्वल स्थानी कायम असून १२६ गुणांसह आॅस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे.
या क्रमवारीत भारताला दोन गुणांचा फायदा होऊन १२३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

पहिल्या ७ स्थानांमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. नवव्या स्थानावर श्रीलंका संघाची घसरण होऊन त्यांच्या जागी अफगाणिस्तानचा संघ विराजमान झाला आहे.

२०१४-१५ या काळात खेळलेल्या टी२० सामन्यांचे निकाल क्रमवारीतून काढून टाकत आयसीसीने आज नविन क्रमवारी जाहीर केली. तसेच यात २०१५-१६ तसेच २०१६-१७ या वर्षातील कामगिरीला ५०% मह्त्त्व देण्यात आले आहे.

याचमुळे श्रीलंका संघाला अापले काही गुण गमवावे लागले तर अफगाणिस्तानला याचा फायदा झाला.

बांग्लादेश या क्रमवारीत १०वा असून त्यानंतर स्काॅटलंड, झिम्बांब्वे, नेदरलॅंड, संयुक्त अरब अमिराती हाॅंग-काॅंग, ओमान आणि आयर्लंड हे संघ आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

धावा करण्यात रोहित नापास, मात्र कॅच घेण्यात नाद करायचा नाही

बेंगलोर शहरातील कॅफेनेही केले कोहलीच्या आरसीबीला ट्रोल

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पुढे ढकलली

आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?

Video- चक्क स्टेडियमच्या बाजूला क्रेन उभे करून त्या फूटबाॅल वेड्याने घेतला सामन्याचा आनंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment