---Advertisement---

पीएसएलमध्ये कॉलिन मुनरो-उस्मान ख्वाजाच्या जोडीने गोलंदाजांची केली यथेच्छ धुलाई, पाहा व्हिडिओ

On: रविवार, जून 13, 2021 1:55 AM
---Advertisement---

टी-२० सामने म्हटले की, त्यात चौकार षटकारांची आतिषबाजी आलीच. प्रत्येक टी -२० सामन्यात काहीना काही विक्रम होतच असतात. संयुक्त अरब अमिराती(युएई) येथे सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीग(पीएसएल) मध्येही शुक्रवारच्या सामन्यात दोन फलंदाजांकडून आतिषबाजी पाहायला मिळाली. तो दोन फलंदाज म्हणजे कॉलिन मुनरो आणि उस्मान ख्वाजा.

सध्या युएईमध्ये पाकिस्तान सुपर लीगचे उर्वरित सामने चालू आहेत. शुक्रवारी झालेल्या इस्लामाबाद विरुद्ध क्वेटा सामन्यात, क्वेटा संघाने २० षटकात १३३ धावा केल्या होत्या. त्यांनी दिलेल्या १३४ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इस्लामाबाद संघाकडून कॉलीन मुनरो आणि उस्मान ख्वाजा ही सलामी जोडी मैदानात उतरली. या दोघांनीही ताबडतोड फटकेबाजी करत नाबाद १३७ धावांची भागीदारी करत केवळ १० षटकात इस्लामाबादला विजय मिळवून दिला. हा पीएसएलमधील सर्वात मोठा विजय ठरला.

मुनरोने विरुद्ध संघाच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. मुनरोने ३६ चेंडूत ९० धावांची नाबाद खेळी केली. त्यात त्याने १२ चौकार आणि ५ षटकार ठोकले. उस्मान ख्वाजानेसुद्धा मुनरोला चांगली साथ दिली. त्याने २७ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४० धावा केल्या. दोघांमध्ये ६० चेंडूत १३७ धावांची नाबाद शतकीय भागीदारी झाली.

कॉलीन मुनरो न्यूझीलंडचा खेळाडू असून त्याने आजवर न्यूझीलंड संघासाठी ६५ टी -२० सामने खेळले आहेत ३१.३च्या सरासरीने १७२४ धावा केल्या आहेत. टी -२० मध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १०९ राहिली आहे. तसेच उस्मान ख्वाजा ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू असून त्याने ऑस्ट्रेलिया संघा साठी केवळ ९ टी -२० सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने २६.८च्या सरासरीने २४१ धावा केल्या. त्याची सर्वोत्तम खेळी ५८ धावांची राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत भविष्यात टीम इंडियात जागा मिळवू शकतात ‘या’ दिग्गजांची मुलं

‘विश्वास आहे मी चांगल्या स्थितीत असेल’, कसोटी चॅम्पियनशीप फायनलसाठी ट्रेंट बोल्ट सज्ज

शाकिब अल हसनच्या बचावासाठी पत्नी आली पुढे; म्हणाली, ‘त्याला खलनायकाच्या रुपात दाखवले जात आहे’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---