आजच्या काळात टी20 फॉरमॅटची क्रेझ उच्च पातळीवर पोहोचली आहे. आता गेल्या काही वर्षांत संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप व्यस्त होऊ लागले आहेत. त्यांच्या सामन्यांचे आकडे वेगाने वाढवत आहेत. ज्यामध्ये पाकिस्तान संघाने एक खास रेकाॅर्ड आपल्या नावावर केला. पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात 250 सामने पूर्ण करणारा पहिला संघ ठरला आहे. झिम्बाब्वेविरूद्धच्या टी20 सामन्यात प्रवेश करताच त्यांनी हा विश्वविक्रम केला.
तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण त्या 5 संघांबद्दल जाणून घेऊया. ज्यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळले आहेत.
1) पाकिस्तान 250 सामने- पाकिस्तानने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. पाकिस्तानने 250 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे. पाकिस्तानी संघाबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी 2006 मध्ये पहिला सामना खेळला होता. पाकिस्तानने आतापर्यंत 250 सामन्यांपैकी 143 सामने जिंकले आहे.
2) भारत 242 सामने- भारतीय क्रिकेट संघाने 18 वर्षांपूर्वी पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. डिसेंबर 2006 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यानंतर भारतीय संघ हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत 242 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 160 सामने जिंकले आहेत.
3) न्यूझीलंड 222 सामने- न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलियासह टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करणारा संघ आहे. पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. 2005 पासून न्यूझीलंडने 222 सामने खेळले आहेत. दरम्यान त्यांनी 112 सामने जिंकले आहेत.
4) वेस्ट इंडिज 213 सामने- टी20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 विजेतेपद पटकावणाऱ्या वेस्ट इंडिजने या फॉरमॅटवर वर्चस्व राखले आहे. त्यांनी 2006 मध्ये पदार्पण केल्यापासून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 213 सामने खेळले आहेत. या कालावधीत वेस्ट इंडिजने 93 सामने जिंकले आहेत.
5) ऑस्ट्रेलिया 203 सामने- टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात पहिला सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 203 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने 2005 मध्ये या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो सतत खेळत आहे. सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ पाचव्या स्थानावर आहे. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 112 सामने जिंकले आहेत.
🚨 𝑯𝑰𝑺𝑻𝑶𝑹𝒀 🚨
Pakistan becomes the first team ever to play 250 T20I matches, taking on Zimbabwe in the second T20I 🇵🇰👏
Can they make it special with a victory? 🤔#Pakistan #ZIMvPAK #T20Is #Sportskeeda pic.twitter.com/xXYUJOU3Qf
— Sportskeeda (@Sportskeeda) December 3, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; बुमराहला घाबरलाय कांगारू संघ? ऑस्ट्रेलिया खेळाडूचे मोठे वक्तव्य
IND vs AUS; दुसऱ्या कसोटीपूर्वी माजी दिग्गजाचा ऑस्ट्रेलियाला सल्ला! म्हणाला…
SMAT; आरसीबीच्या 2 धुरंधरांनी फलंदाजीत केला कहर, गोलंदाजांवर गाजवले वर्चस्व