---Advertisement---

Breaking: पाकिस्तानी संघाने सोडला सुटकेचा नि:श्वास! अखेर शाहीन आफ्रिदीची जागा घेण्यास ‘हा’ गोलंदाज सज्ज

On: सोमवार, ऑगस्ट 22, 2022 1:20 PM
Shaheen Afridi & Babar Azam
---Advertisement---

येत्या २७ ऑगस्ट पासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. या आशिया चषकापूर्वी पाकिस्तानचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीला दुखापत झाल्याने त्याला संघातून बाहेर जावे लागले. त्यामुळे पाकिस्तानी संघ त्याच्या चांगल्या रिप्लेसमेंटच्या शोधात होता. पाकिस्तानी संघाचा हा शोध अखेर संपला आहे. शाहीन आफ्रिदीच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैन याची पाकिस्तानी संघात वर्णी लागली आहे. 

शाहीन आफ्रिदी बाहेर पडल्याने पाकिस्तानी संघ चिंतेत सापडला होता. मात्र, आता मोहम्मद हसनैन सारखा एक उत्तम प्रतिभा असलेला गोलंदाज संघात सामील झाल्याने पाकिस्तानी कर्णधार बाबार आझमने सुटकेचा निश्वास सोडला. त्यामुळे आता भारतावरून आफ्रिदीचे संकट टळले असले, तरी हसनैन नावाच वादळ फलंदाजांची वाट पाहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

चहलशी संबंध बिघडल्याच्या…! धनश्रीने इंस्टा पोस्टमध्ये दिली सविस्तर माहिती
Third ODI: झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारत सज्ज, २ बदलांसह अशी आहे प्लेइंग इलेव्हन

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---