आशिया चषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामन्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या सामन्याच्या तिकिटांचीही विक्री झाली आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघ मंगळवारी दुबईला पोहोचला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ लवकरच सरावाला सुरुवात करेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Pakistan squad arrives in Dubai 🛬#BackTheBoysInGreen pic.twitter.com/pcESWSIoPH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 23, 2022
विशेष म्हणजे, पाकिस्तानने फखर जमान, हैदरी, आसिफ अली आणि खुशदिल शाह यांचा संघात फलंदाज म्हणून समावेश केला आहे. त्याचबरोबर इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना अष्टपैलू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान हा देखील संघाचा भाग आहे. शिवाय गोलंदाजी क्रमात हॅरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद हसनैन आणि उस्मान यांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: बंगळुरूमध्ये बुमराह-पटेल जोडी गाळत आहे घाम, दुखापतीनंतर केला सराव सुरू
मोठी बातमी। सानिया मिर्झाने यूएस ओपनमधून घेतली माघार! पोस्ट करत सांगितले खरे कारण