श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाहुण्या पाकिस्तान संघाने वर्चस्व गाजवले. आधी गोलंदाजाने केलेल्या शानदार कामगिरीनंतर फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत पहिला दिवस पाकिस्तानच्या पारड्यात टाकला. गोलंदाजीत अबरार अहमद व गोलंदाजीत अब्दुल्ला शफिक यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.
कोलंबो येथे होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय चुकला. धावबादच्या रूपाने पहिला गडी बाद झाल्यानंतर वेगवान गोलंदाज नसीम शाह व शाहीन आफ्रिदी यांनी घातक गोलंदाजी करत श्रीलंकेला अडचणीत आणले. त्यानंतर युवा फिरकीपटू अबरार अहमद याने गोलंदाजीला श्रीलंकेच्या डावाची वाताहात केली. त्याने चार तर शाहने तीन बळी घेत श्रीलंकेचा डाव अवघ्या 166 धावांवर संपुष्टात आणला. श्रीलंकेसाठी सर्वाधिक 57 धावांची खेळी धनंजया डी सिल्वा याने केली.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली इमाम उल हक केवळ सहा धावा करून बाद झाल्यानंतर, अब्दुल्ला शफीक व शान मसूद यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. या दोघांनी शंभर चेंडूमध्ये शंभर धावांची भागीदारी करत श्रीलंकेला बॅकफुटवर ढकलले. शानने 47 चेंडूंवर 51 धावांची वादळी खेळी केली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने दोन गडी गमावत 145 धावा केल्या होत्या. शफिक 99 चेंडूवर 74 व कर्णधार बाबर आझम नाबाद आठ धावांवर खेळत आहे. श्रीलंकेसाठी दोन्ही बळी वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो याने मिळवले.
मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला होता. हा सामना जिंकून पाकिस्तान जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत अव्वलस्थानी जाण्याचा प्रयत्न करेल.
(Pakistan Team Show Bazball Cricket Against Srilanka In Colombo Test)
महत्वाच्या बातम्या –
‘ती खेळापेक्षा मोठी नाही, शिस्तभंगाची कारवाई करा’, विश्वविजेत्या खेळाडूची आयसीसीकडे मागणी
BREAKING! त्रिनिदादमध्ये शेवटच्या दिवशी पावसाची हजेरी! वेस्ट इंडीजसाठी चिंतेची बाब