सध्या न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. पाकिस्तान संघाने सामना निकाली लावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्चाया काहीही उपयोग झाला नाही. पाकिस्तानने पाचव्या दिवशी न्यूझीलंड संघाला तिसऱ्या सत्रात 138 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाने1 बाद 61 धावा केल्या होत्या. मात्र, खराब प्रकाशामुळे पुढचा खेळ शक्य होऊ शकला नाही आणि सामन्या अनिर्णित राहिला. सामना संपल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याने पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने काही पत्रकारांना सहजतेने उत्तरे दिले, पण त्याने एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर वेगळ्याच देहबोलीने प्रतिक्रिया दिली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जेव्हा बाबर प्रेसरुममधून बाहेर जात होता, तेव्हा एक पत्रकार जोरात ओरडला,”ही कोणती पद्धत आहे ? आम्ही इकडे प्रश्न विचारण्यासाठी इशारे करत आहोत आणि तुम्ही बाहेर जात आहात.” यानंतर बाबरने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि काहीवेळ पत्रकाराला रागाने बघीतले. याबाबत अशीही माहिती समोर येत आहे की, या पत्रकाराने कीही दिवसांपूर्वी बाबरला न रुचणारा प्रश्न विचारला होता.
बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाचे 2022 हे वर्ष कसोटीच्या दृष्टीने थोडे वाईट ठरले. पाकिस्तान आपल्या घरच्या मैदानावर 7 कसोटी सामने खेळले, पण या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानला 4 कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर त्यातील 3 सामने अनिर्णित राहिले. इंग्लंड संघाने तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला आणि न्यूझीलंड संघ सध्या दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला, तर दुसरा कसोटी सामना 2 जानेवारीपासून कराची येथे खेळवला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताने 2022मध्ये जिंकले सर्वाधिक सामने, तरीही झाली निराशा; पाकिस्तान खूपच मागे
रिषभ पंत हेल्थ अपडेट: पंतच्या मेंदू, पाठीच्या कण्याचे एमआरआय स्कॅन रिपोर्ट्स आले समोर