ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने पाकिस्तान कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांचे कौतुक केले आहे. त्याने गिलेस्पीची तुलना गेल्या महिन्यात भारताचे मुख्य प्रशिक्षक बनलेल्या गौतम गंभीरशी केली आहे. पाँटिंग म्हणतो की दोघेही शांतपणे निर्णय घेतात.पाँटिंगने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये गिलेस्पीबाबत केलेल्या चर्चांच्या खुलासा केला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या वर्षी एप्रिलमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज गिलेस्पीची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्याचवेळी पीसीबीने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गॅरी कर्स्टन यांना वनडे आणि टी20 संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवले होते.
पाँटिंग आणि गिलेस्पी बऱ्याच काळापासून एकत्र खेळले आहेत. आयसीसीशी बोलताना पाँटिंग म्हणाला, ”जेसन गिलेस्पी थोडा गंभीर आहे. तो कुठेही गेला तरी त्याचा कोचिंग रेकॉर्ड खूप चांगला राहिला आहे. त्याला काही आव्हानांचा सामना करावा लागेल यात मला शंका नाही. पण तो एक असा व्यक्ती आहे जो काळजीपूर्वक विचार करतो आणि नंतर त्याचे अवलंबन करतो. तो शांत आहे आणि त्याच्या पद्धतीने काम करतो.”
शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला 21 ऑगस्टपासून मायदेशात बांग्लादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गिलेस्पीची ही पहिलीच मालिका असणार आहे.
गिलेस्पीच्या प्रशिक्षणाखाली पाकिस्तान संघात बदल पाहायला मिळतील, असा दावा पाँटिंगने केला. “गेल्या अनेक वर्षांपासून आमचे काही व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत ज्यामध्ये जुने खेळाडू आहेत जे एकत्र खेळले आहेत. सर्वांनी गिलेस्पीला नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. खरे सांगायचे तर, संघात बदल झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. मला माहित आहे की हा एक वेगळा फॉरमॅट आहे पण 2024 च्या टी 20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती.
हेही वाचा-
स्टीव्ह स्मिथचा आयपीएलमध्ये कमबॅक! मेगा लिलावासाठी नाव देणार
अद्भूत! अप्रतिम!! अविश्वसनीय!!!, सीएसकेच्या खेळाडूनं घेतला सुपरमॅन स्टाईलमध्ये अशक्य झेल
भारताच्या माजी क्रिकेटपटूला मिळाली मोठी जबाबदारी, या राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती