---Advertisement---

टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान ‘या’ देशाविरुद्ध भिडणार, वेळापत्रक जाहीर!

On: बुधवार, जानेवारी 14, 2026 4:31 PM
---Advertisement---

टी-20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होत आहे. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व 20 संघ आता तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तान या वर्ल्ड कपमधील आपले सर्व सामने भारताच्या मैदानावर नाही, तर श्रीलंकेत खेळणार आहे. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड एका बलाढ्य देशाविरुद्ध टी-20 मालिका खेळणार असून, ही मालिका वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावरून असे म्हणता येईल की, मेगा इव्हेंटपूर्वी पाकिस्तानने मोठी खेळी खेळली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर 29 जानेवारी, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2026 या चार दिवसांच्या कालावधीत हे तीन सामने होतील. ऑस्ट्रेलियाचा संघ 28 जानेवारीला लाहोरमध्ये दाखल होईल.

दुसरीकडे, वर्ल्ड कपपूर्वी दोन्ही संघांतील अनेक स्टार खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. ऑस्ट्रेलियाचे जॉश हेझलवुड, पॅट कमिन्स आणि टिम डेव्हिड दुखापतीतून सावरत आहेत, तर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी देखील सध्या जखमी आहे. बिग बॅश लीग खेळताना त्याला ही दुखापत झाली होती.

पीसबीचे (PCB) सीओओ सुमैर अहमद सय्यद यांनी ऑस्ट्रेलियाचे स्वागत करताना म्हटले की, “आम्ही लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचे यजमानपद भूषवण्यासाठी प्रचंड उत्सुक आहोत. हा दौरा पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी वर्षाची धमाकेदार सुरुवात असेल. मी चाहत्यांना आवाहन करतो की, त्यांनी मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येऊन दोन्ही संघांना पाठिंबा द्यावा.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---