पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक बाबत अजुनही प्रश्न चिन्ह कायम आहे. तसेच भारतीय संघ या स्पर्धेत सहभाग घेणार का नाही याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र यादरम्यान पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिका आयोजित केली जाणार आहे. तर या तिरंगी मालिकेत तीन संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे जवळपास दोन दशकांनंतर म्हणजेच जवळपास २१ वर्षांनी पाकिस्तानच्या भूमीवर तिरंगी मालिका होणार आहे. यापूर्वी 2004 मध्ये पाकिस्तानने तिरंगी मालिकेचे आयोजन केले होते.
याबरोबरच, 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही तिरंगी मालिका आयोजित केली जाणार आहे. तसेच आशिया चषक 2023 प्रमाणेच ही स्पर्धाही आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. सध्या, त्याआधी पाकिस्तानी संघ दोन देशांच्या संघांचे यजमानपद आणि तिरंगी मालिका आयोजित करेल. पण नुकतीच न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 मालिकाही आयपीएल दरम्यान आयोजीत करण्यात आली आहे. तर ही मालिका 2024 च्या टी20 विश्वचषकापूर्वी होणार आहे.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या या तिरंगी मालिकेत पाकिस्तानसह तीन संघ खेळणार आहेत. यात यजमान पाकिस्तान व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सहभागी होणार आहेत. ही तिरंगी मालिका फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित केली जाईल. तसेच या मालिकेसाठी या दोन्ही देशांच्या प्रमुखांनी पाकिस्तानला भेट देण्याचे निमंत्रणही दिले आहे.
PCB set to host tri-series after two decades
Read more ⤵️ https://t.co/GF44J0vKY0
— PCB Media (@TheRealPCBMedia) March 15, 2024
दरम्यान, पाकिस्तानने शेवटची तिरंगी मालिका 2004 मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वेसोबत खेळली होती. याबाबत पाकिस्तानचे अध्यक्ष म्हणाले होते की, ‘पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी मालिका रोमांचक होईल. ही मालिका बऱ्याच दिवसांनी पाकिस्तानात होणार आहे. याबद्दल न्यूझीलंड क्रिकेट आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुखांचे आभार व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- RCB Vs DC : स्मृती मानधना 17 मार्चला रचणार इतिहास, अन् विराट कोहलीचे होणार स्वप्न पूर्ण
- ऋषभ पंत ते मिचेल स्टार्क पर्यंत, आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी हे ‘7’ खेळाडू पुनरागमन करण्यासाठी सज्ज