---Advertisement---

खराब नशिबात पाकिस्तान नंबर वन! वर्ल्ड कपमधील ‘त्या’ अजब रेकॉर्डने वाढवलं टेन्शन

On: रविवार, फेब्रुवारी 22, 2026 8:30 PM
---Advertisement---

​टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 चा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात गेल्या शनिवारी (21 फेब्रुवारी) होणार होता, परंतु पावसामुळे खेळाचा विचका झाला आणि हा सामना रद्द करावा लागला. सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानच्या नावावर एक अतिशय विचित्र विक्रम जमा झाला आहे, जो पाहून तुम्हीही म्हणाल की, ‘खराब नशिबाच्या’ बाबतीत पाकिस्तानचा संघ सर्वात वर आहे.

​पाऊस म्हणजेच ‘कुदरत का निजाम’ पाकिस्तानसाठी आफत ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक सामने रद्द होण्याचा विक्रम आता पाकिस्तानच्या नावावर झाला आहे.

​आता या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे एकूण 7 सामने रद्द झाले आहेत. यासह आयर्लंडचा विक्रम मोडला गेला आहे; आयर्लंडचे आतापर्यंत 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने रद्द झाले आहेत. अशा प्रकारे, या विचित्र विक्रमाच्या यादीत पाकिस्तान आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.

​पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉईंट देण्यात आला आहे. आता हे 1-1 गुण दोन्ही संघांसाठी पुढे कसे फायदेशीर ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

​विशेष म्हणजे, पाकिस्तानला सुपर-8 मध्ये आपला पुढचा सामना 24 फेब्रुवारीला इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर संघ तिसऱ्या लढतीत 28 फेब्रुवारीला श्रीलंकेचा सामना करेल. सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला हे दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. आता पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत कुठपर्यंत मजल मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानने चारपैकी तीन सामने जिंकले होते. नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून संघाने स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती. त्यानंतरच्या सामन्यात पाकिस्तानने अमेरिकेवर (USA) 32 धावांनी विजय मिळवला. मात्र, पुढच्या सामन्यात भारताकडून त्यांना 61 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या सामन्यात मात्र पाकिस्तानने नामिबियाचा 102 धावांनी मोठा पराभव केला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---