पुढील महिन्यात खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकांसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तान संघाच्या अडचणी कमी व्हायचे नाव घेईनात. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर, शनिवारी (२८ नोव्हेंबर) पुन्हा एका अन्य क्रिकेटपटूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सातवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, हा दौरा रद्द होण्याचे संकट आहे.
दोन दिवसांपूर्वी सहा खेळाडू आढळले होते कोरोना पॉझिटिव्ह
पाकिस्तान संघ पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी व दोन टी२० सामने खेळण्यासाठी क्राईस्टचर्च येथे चार दिवसांपूर्वीच दाखल झाला आहे. दोन दिवसांनी पाकिस्तानचे सहा क्रिकेटपटू कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर, सर्व खेळाडूंना हॉटेलच्या खोल्यांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. पाकिस्तान संघाला सराव करण्यासही बंदी घालण्यात आले आहे.
न्यूझीलंड आरोग्य विभागाने केली सातव्या पॉझिटिव्ह खेळाडूची पुष्टी
आज सकाळी न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाकडून पाकिस्तानचा सातवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले, “पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सातव्या सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पाकिस्तान संघासाठीच्या क्वारंटाईन नियमांना अधिक कडक करण्यात येईल.”
पाकिस्तान संघाला अखेरचा इशारा
न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाचे प्रमुख असलेल्या एश्मे ब्लूमफिल्ड यांनी माहिती देताना सांगितले, “आम्ही देशातील लोकांच्या आरोग्याविषयी खूप गंभीर आहोत. पाकिस्तान संघाचे सात खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झालेत. पाकिस्तान संघाला आम्ही क्वारंटाईन नियमावली पाठवली आहे. त्यांनी यापुढे नियम तोडण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्यासाठी हा अंतिम इशारा आहे.”
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी तब्बल ५३ जणांचा भलामोठा संघ पाठवला आहे. पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्या दरम्यान दोन कसोटी व दोन टी२० सामने खेळवण्यात येतील.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे…! भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात अवघ्या ७ धावांनी हुकला हा मोठा विक्रम
एकाच सामन्यात दोन धक्के! आयसीसीने टीम इंडियावर ठोठावला मोठा दंड
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’
भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके
भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला