Bangladesh vs Pakistan Test Match Ticket Prize : बांगलादेश क्रिकेट संघ सोमवारी (12 ऑगस्ट) पाकिस्तानात पोहोचला असून दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यापूर्वी कसोटी सामन्यांची तिकीट विक्री सुरू झाली आहे. मात्र पाकिस्तान-बांगलादेश कसोटी सामन्यांच्या तिकिटांची किंमत उघड होताच सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली उडवली जाऊ लागली. खरे तर पाकिस्तानात समोस्यांपेक्षा सामन्यांची तिकिटे स्वस्त आहेत.
सोमवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केले की, कसोटी सामन्यांची तिकिटे परवडणाऱ्या दरात उपलब्ध असतील. मात्र सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत फक्त 15 रुपये (50 पाकिस्तानी रुपये) आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यांच्या तिकिटांचे दर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. भारतात एवढ्या रुपयांत एक समोसा मिळतो, असे नेटिझन्सचे म्हणणे आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेसाठी सामान्य तिकीट दर प्रतिदिन 50 रुपये ठेवण्यात आले आहे. याशिवाय प्रथम श्रेणीच्या तिकिटाची किंमत प्रतिदिन 100 पाकिस्तानी रुपये, प्रीमियर तिकिटाची किंमत प्रतिदिन 200 पाकिस्तानी रुपये आणि व्हीआयपी तिकिटाची किंमत प्रतिदिन 400 पाकिस्तानी रुपये ठेवण्यात आली आहे. पूर्ण 5 दिवसांचे तिकीट घेतल्यावर 15 टक्के सूट दिली जात आहे.
15rs me to ek samosa aayega 😁😀 inke so called brand ab 25 dollar ki selfie se 15 rs ke samose ki aukaat 😁😁 pe aa gaye
— Rishu singh Rajput (@Rishusi95529688) August 13, 2024
दरम्यान पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. रावळपिंडीच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. तर कराची स्टेडियमवर ऑगस्ट अखेर दुसऱ्या व शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. हा सामना 3 सप्टेंबर रोजी संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी ‘या’ दिग्गज खेळाडूला झाली मोठी दुखापत
इशानकडे स्वत:हून चालून आली संधी, संघात पुनरागमन करताच गळ्यात पडली कर्णधारपदाची माळ
पुणे फुटबाॅल: रूपाली एससीचा सहज विजय