---Advertisement---

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला झटका, स्टार खेळाडू पडला बाहेर

Indian-Cricket-Team
---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्या कमरेत वेदना झाल्या. त्यामुळे त्याला पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागले. अलीकडेच, दुखापतीतून सावरलेला अय्यर भारताच्या ताफ्यात जोडला गेला होता. अशात त्याच्या दुखापतीने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची तयारी करत असलेल्या भारतीय संघाची चिंता वाढवली आहे. बीसीसीआयने त्याच्या दुखापतीविषयी मोठी अपडेट दिली आहे.

पाकिस्तानविरुद्ध श्रेयस अय्यर खेळू शकला नव्हता. आता माध्यमांतील वृत्तांनुसार, श्रेयस श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातूनही बाहेर पडला आहे. अय्यर कोलंबोमध्येच बीसीसीआयच्या मॅनेजर आणि एनसीए स्टाफच्या देखरेखीखाली आहे.

अय्यरच्या दुखापतीवर बीसीसीआयकडून अपडेट
बीसीसीआयने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या दुखापतीविषयी माहिती दिली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत लिहिले की, “श्रेयस अय्यरला आधीपेक्षा बरे वाटत आहे. मात्र, त्याच्या पाठीच्या ताणाची समस्या अद्याप पूर्णपणे ठीक झाली नाहीये. त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने विश्रांतीचा सल्ला देत श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक सुपर- 4 सामन्यासाठी संघासोबत स्टेडिअममध्ये जाण्यास सांगितले नाहीये.”

खरं तर, श्रेयस अय्यर याने दीर्घ काळानंतर दुखापतीतून पुनरागमन केले आहे. तो जवळपास सहा ते सात महिन्यांनंतर भारतीय संघात सामील झाला आहे. मात्र, तो पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला आहे.

अय्यरच्या जागी राहुलला मिळाली संधी
श्रेयस अय्यर याच्या दुखापतीमुले पाकिस्तान संघाविरुद्धच्या सामन्यात केएल राहुल याला संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना राहुलने नाबाद 111 धावांची शतकी खेळी साकारली होती. भारताने पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक 2023 सुपर- 4 सामन्यात 228 धावांनी विजय मिळवला होता.

संजय मांजरेकरांनी उपस्थित केला प्रश्न
संजय मांजरेकरांनी भारताच्या डावापूर्वी स्टार स्पोर्ट्सशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, “मी फक्त श्रेयस अय्यर याच्या फिटनेससाठी उत्सुक आहे. तो दीर्घ काळ विश्रांतीवर होता. मोठी बाब अशी की, तो आता फिट आहे. आता त्याला अचानक पाठीचा त्रास झाला आहे. जर कर्णधार आणि संघ व्यवस्थापनासाठी असे मुद्दे असतील, तर तुम्हाला खेळाडूंना पाहणे सुरू करावे लागेल.”

रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड चिंतेत असतील. कारण, त्यांनी अय्यरच्या पुनरागमनावेळी चौथ्या क्रमांकावरील जागा जवळपास निश्चित केली होती. अय्यर मार्चच्या मध्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाहीये. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला पूर्ण आयपीएल खेळता आली नव्हती. मात्र, विश्वचषकाच्या एक महिन्यापूर्वीच अय्यरच्या दुखापतीने भारतीय संघाच्या चिंतेत भर घातली आहे. (pakistan vs india asia cup 2023 cricketer shreyas iyer injury update as team india prepares odi world cup 2023)

हेही वाचा-
आता आशिया चषकात Reserve Day नाही; पावसाने खोडा घातला, तर ‘हे’ दोन संघ खेळणार Final
भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पराकोटीचा आनंद, ट्वीट करत म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---