---Advertisement---

पाकिस्तावरील विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पंजाबी भांगडा, पहा व्हिडीओ

On: बुधवार, नोव्हेंबर 21, 2018 1:56 PM
---Advertisement---

आबू धाबी | पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने ४ धावांनी शानदार विजय मिळवला.

शेवटची विकेट बाकी असताना पाकिस्तानला जिंकण्यासाठी ११ धावांची गरज होती. मैदानावर अझर अली आणि मोहम्मद अब्बास हे खेळाडू होते. त्यात अझर अली तर १३६ चेंडूत ६५ धावांवर खेळत होता.

तरीही पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर जीत रावल, अजाज पटेल आणि इश सोधीने ड्रेसिंग रुममध्ये भांगडा केला.

जो व्हिडीओ व्हायरल झाला त्यात दोन खेळाडू भांगडा करताना दिसत आहे. ४ धावांनी विजय मिळवल्यावर ‘मुंडिया तू बचके रहे’ या गाण्यावर या खेळाडूंनी ठेका धरला होता.

अजाज पटेल या खेळाडूने न्यूझीलंडला हा रोमहर्षक विजय मिळवून दिला.

अजाज पटेलचा जन्म मुंबईमधील असून त्याने वयाच्या ३०व्या वर्षी कसोटीत पदार्पण केल आहे. हा त्याचा कसोटी पदार्पणाचाच सामना होता. याचवर्षी तो न्यूझीलंडकडून दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळला आहे.

या सामन्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या.

३० वर्षांचा हा क्रिकेटर मुंबईकडून कोणताही सामना मात्र खेळला नाही. त्याचे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कारकिर्द ही न्यूझीलंडकडून घडली आहे.

न्यूझीलंडचा हा कसोटीतील सर्वात कमी धावांनी झालेला विजय आहे. यापुर्वी त्यांनी २०११ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ७ धावांनी विजय मिळवला होता.

तसेच कसोटी इतिहासातील हा कमी धावांनी मिळवलेला पाचवा विजय आहे.

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा- 

१८ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी

आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी

आज हिटमॅन रोहित करणार टी२०मधील सर्वात हिट कारनामा

टीम इंडियाला टी२०चा इतिहास नव्याने लिहिण्याची आज संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment